Kirit Somaiya : अजित पवार, मुश्रीफ आणि भावना गवळींवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर किरीट सोमय्या म्हणाले, ‘मी शोधलेल्या घोटाळ्यांत तथ्य, …’

सोमय्या यांनी एकेकाळी अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी यांना सळो कि पळो करून सोडले होते.

171

एकेकाळी भाजपचे नेते किरीट सॊमय्या (Kirit Somaiya) यांनी एकामागून एक घोटाळे बाहेर काढले, त्यापैकी काही नेते नंतर भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. यावरून किरीट सोमय्या यांना माध्यमांकडून वारंवार त्यांनी बाहेर काढलेल्या घोटाळ्यांविषयी विचारणा केली जाते. पुन्हा एकदा सोमय्या यांना याविषयी माध्यमांनी विचारले असता, सोमय्या (Kirit Somaiya) यांनी याबाबत थेट खुलासा केला आहे.

सोमय्या (Kirit Somaiya) यांनी एकेकाळी अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी यांना सळो कि पळो करून सोडले होते. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. मात्र आता या नेत्यांची चौकशी संथ गतीने सुरु आहे. पैकी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ४४ आमदार सोबत घेऊन भाजपप्रणीत महायुती सरकारला पाठिंबा दिला आणि उपमुख्यमंत्री बनले. हसन मुश्रीफ हेही शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झाले. तर भावना गवळी याही उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाल्या आहेत.

(हेही वाचा Army Day India : भारतीय सेनेच्या पराक्रमाचे स्मरण करणारा भारतीय सेना दिवस)

काय म्हणाले सोमय्या? 

यावर बोलताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya)  म्हणाले, मी ज्या-ज्या तक्रारी केल्या. त्यामध्ये १०० टक्के तथ्य आढळले, खऱ्या निघाल्या. ३९ घोटाळे मी बाहेर काढले. त्या सगळ्याची चौकशी पुढे झाली. कोणाची मालमत्ता यंत्रणांनी जप्त केली. कुठे चौकशी, गुन्हे दाखल झाले आहेत. हसन मुश्रीफ यांचे प्रकरण न्यायालयात सुरु आहे. यावर न्यायालय निर्णय देईल. भावना गवळी यांची सव्वा आठ कोटींची मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली आहे. जरंडरेश्वर साखर कारखान्याचीही चौकशी सुरु आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.