India Maldives conflict : अखेर भारताने मौन सोडलं; परराष्ट्रमंत्री म्हणाले …

मालदीवच्या तीन नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यातील राजनैतिक वाद उफाळून आला. भारताने या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला.

268
India Maldives conflict : अखेर भारताने मौन सोडलं; परराष्ट्रमंत्री म्हणाले ...

भाताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मालदीवसोबत (India Maldives conflict) सुरू असलेल्या राजनैतिक वादावर अखेर मौन सोडलं आहे. “प्रत्येक देश भारतासोबत असेल, भारताला पाठिंबा देईल अशी खात्री देता येत नाही,” असं ते म्हणाले आहेत.

(हेही वाचा – India Maldives conflict : भारताने १५ मार्चपर्यंत मालदीवमधून सैन्य हटवावे – अध्यक्ष मोइझू)

प्रत्येक वेळी आम्ही…

नागपूरमधील टाऊनहॉल बैठकीत मालदीवसोबत (India Maldives conflict) नुकत्याच झालेल्या तणावाबाबत विचारले असता जयशंकर म्हणाले, “राजकारण हे राजकारण आहे. प्रत्येक देशातील प्रत्येकजण आपल्याला पाठिंबा देईल किंवा नेहमीच आमच्याशी सहमत असेल याची मी हमी देऊ शकत नाही.”आम्ही जे करण्याचा प्रयत्न करीत आहोत ते म्हणजे इतर देशांशी संपर्क मजबूत करणे. यात आपल्याला खूप यश मिळाले आहे. गेल्या दहा वर्षांत आपण अनेक देशांशी चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत.”

(हेही वाचा – Chief Minister Yogi Adityanath: अयोध्येत जगातील पहिल्या सेव्हन स्टार शाकाहारी हॉटेल्सचा प्रस्ताव)

इतर देशांमधील पायाभूत सुविधांच्या विकासात भारताचा सहभाग –

राजकीय संबंधांमध्ये चढ-उतार असूनही लोकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून जागतिक स्तरावर मजबूत संबंध निर्माण करण्यासाठी गेल्या दशकात भारताने (India Maldives conflict) केलेल्या प्रयत्नांची माहिती जयशंकर यांनी दिली. “राजकारण अस्थिर असू शकते, परंतु त्या देशातील लोकांच्या भारताविषयी चांगल्या भावना आहेत आणि त्यांना चांगल्या संबंधांचे महत्त्व समजते”, असे ते म्हणाले. याशिवाय, इतर देशांमधील पायाभूत सुविधांच्या विकासात भारताच्या सहभागाचा देखील त्यांनी उल्लेख केला.

(हेही वाचा – INDI alliance ला मोठा धक्का; बसप लोकसभा स्वबळावर लढणार)

पुढे बोलताना जयशंकर म्हणाले की, “कधीकधी गोष्टी योग्य दिशेने जात नाहीत. मग तुम्हाला सर्वकाही योग्यरित्या करण्यासाठी तर्क लावावे लागतात

मालदीवच्या (India Maldives conflict) तीन नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर आणि त्यांच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्यावर टीका केल्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यात वाद निर्माण झाला. भारताने या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आणि मालदीवच्या राजदूताला बोलावून आपला निषेध नोंदवला. देशाच्या पंतप्रधानांबद्दल केलेल्या चुकीच्या टिप्पणीमुळे भारतीय लोकांमध्ये संताप निर्माण झाला. लोकांनी ‘बॉयकॉट मालदीव’ नावाची मोहीम सुरू केली. वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर मालदीव सरकारने आपल्या तीन मंत्र्यांना निलंबित केले. (India Maldives conflict)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.