INDI alliance ला मोठा धक्का; बसप लोकसभा स्वबळावर लढणार

कोणत्याही पक्षासोबत युती-आघाडी केली तर निवडणुकीत आमचा पराभव होईल, असे मायावती म्हणाल्या.

136
Loksabha Election : मायावतींना मिळणार दक्षिणेची सोबत
INDI alliance मध्ये बहुजन समाज पक्ष या पक्षाचेही स्थान असणे या आघाडीसाठी महत्वाचे आहे. मात्र या आघाडीत बसप सहभाग होणार नाही. तसा निर्णय बसपच्या प्रमुख मायावती यांनी घेतला आहे. हा INDI alliance ला मोठा धक्का असल्याचे समजले जात आहे.
INDI alliance या आघाडीसोबत जाऊन निवडणूक लढवली तर आमचा पराभव होईल. त्यामुळे बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी मायावती यांनी इतिहासाला उजाळा दिला आहे. आम्ही उत्तर प्रदेशात स्वबळावर निवडणूक लढवून राज्यात सरकार स्थापन केले आहे. त्याच अनुभवावरून आम्ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही पक्षासोबत युती-आघाडी करणार नाही. आमच्या पक्षाचे नेतृत्व दलिताच्या हातात असल्याने लढतो. युती केल्याने विरोधी पक्षाला बसपची मते मिळतात. कारण ९०च्या दशकात आमचा फायदा सप आणि काँग्रेसला झाला होता, असेही मायावती म्हणाल्या.

९०च्या दशकात बसपचा सप आणि काँग्रेसला झाला 

बहुजन समाज पक्षाने (बसप) आगामी लोकसभा निवडणूक एकट्याने लढवण्याची घोषणा केली आहे. बसपच्या अध्यक्ष मायावती म्हणाल्या की, कोणत्याही पक्षासोबत युती-आघाडी केली तर निवडणुकीत आमचा पराभव होईल. त्यामुळे त्यांनी एकट्याने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मायावती म्हणाल्या, आम्ही उत्तर प्रदेशात स्वबळावर निवडणूक लढवून सरकार स्थापन केले आहे. त्याच अनुभवाच्या आधारे आम्ही एकटेच सार्वत्रिक निवडणुका लढवू. आम्ही कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही. आमचा पक्ष निवडणूक लढवणार आहे. युती न करता एकट्याने लढतो.पक्षाचे नेतृत्व दलिताच्या हातात असल्याने लढतो.युती केल्याने विरोधी पक्षाला बसपाची मते मिळतात, पण इतरांची मते आपल्याला मिळवता येत नाहीत. सपा आणि ९० च्या दशकात झालेल्या आघाडीचा फायदा काँग्रेसला झाला. यावेळी मायावती यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.