विमानतळ प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ सेवा! या मार्गावर सुरू होणार वातानुकूलित बस

122

आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज अनेक प्रवासी प्रवास करतात. याच पार्श्वभूमीवर विमान प्रवाशांसाठी बेस्ट उपक्रमाकडून विशेष बस चालवल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून वाशी बसस्थानकादरम्यान असलेल्या विमानतळ सेवा -२ या बसमार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. या सेवेचा पाम बीच मार्गावरून कोकण भवन, सीबीजी बेलापूरमार्गे जलवायू विहार, खारघरपर्यंत विस्तार करण्यात आल्याची माहिती उपक्रमाने दिली.

( हेही वाचा : आता बॅंकेच्या पासबुकवर लागणार १८ टक्के GST! कोणत्या वस्तू महागणार? वाचा यादी )

विमानतळ ते खारघर बससेवा 

या मार्गावरून मिडी बस सेवेत असेल. ही बस विमानतळावरून सकाळी ६.२० आणि जलवायू विहार, खारघर येथून पहाटे ४.२० वाजता सुटणार आहे. संपूर्ण आठवडा ही सेवा असले, मुंबई विमानतळ ते वाशीपर्यंत १५० रुपये, तर सीव्हूड १७५ रुपये, सीबीडी २२५ रुपये आणि खारघरपर्यंत २५० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. ११ जुलैपासून ही सेवा सुरू होणार आहे.

नवा बसमार्ग

तसेच बेस्टने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मेट्रो चित्रपटगृह, बॉम्बे रुग्णालय आणि आयकर भवन या मार्गावर येत्या सोमवारपासून बसमार्ग क्रमांक ए ११४ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या मार्गावर धावणार बस

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून महापालिका मार्ग, जिमखाना, मेट्रो चित्रपटगृह आयकर भवन, चर्चगेट स्टेशन, हुतात्मा चौकमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर ही बस धावेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.