BEST विषयी काही तक्रार आहे का? घरबसल्या या ठिकाणी संपर्क साधा

80

बेस्टच्या (BEST) संदर्भात तक्रार असल्यास याआधी कुठे संपर्क साधायचा हे प्रवाशांना माहित नसायचे परंतु अलिकडे सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात बेस्टने प्रवास करताना काही अडचण असल्यास आता तुम्ही सुद्धा घरबसल्या तुमची तक्रार ऑनलाईन नोंदवू शकता. तसेच ट्विटरवर बेस्ट उपक्रमाला टॅग केल्यावर सुद्धा तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाते.

( हेही वाचा : मोबाईल डेटा लवकर संपतोय? लगेच बदला या सेटिंग्ज )

ट्विटरवर तक्रार नोंदवलेल्या प्रवाशांची काही उदाहरणे

बेस्ट प्रवासी कार्तिक रानशेवारे यांनी विद्याविहार ते सुंदरबाग मार्गावर धावणाऱ्या एसी बस क्रमांक ६१३ या मिनी बसमधील तुटलेल्या आसनाचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले यावर लगेच बेस्ट उपक्रमाने दखल नोंदवत बेस्टच्या मेंटेनन्स टीमला यात लक्ष घालण्यास सांगितले आहे.

वीर शहा यांनी बेस्ट उपक्रमासह चलो अ‍ॅपला टॅग करत २०३ क्रमांकाची बस बंद का झाली असा प्रश्न केला. यानंतर यासंदर्भात सुद्धा बेस्ट उपक्रमाने मोबाईल ऑपरेशन टीमला लक्ष घालण्यास सांगितले आहे.

बेस्टच्या खिडकीच्या काचा तुटल्या आहेत, प्रवाशांना योग्य सुविधा नाहीत अशाप्रकारच्या अनेक तक्रारी प्रवासी ट्विटरमार्फत नोंदवत बेस्ट उपक्रमाला टॅग करत करतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या तक्रारी घरबसल्या किंवा प्रवासात सुद्धा ट्विटरवर बेस्ट उपक्रमाला टॅग करत नोंदवू शकता. याची उपक्रमाकडून दखल घेतली जाते.

तसेच बेस्टविषयी तक्रार किंवा सूचना असल्यास [email protected] यावर संपर्क साधा.

इतर विभागीय तक्रारी

मरोळ आगार
[email protected]

बॅकबे आगार
[email protected]

सांताक्रुझ आगार
[email protected]

जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा असल्यास [email protected] याठिकाणी साधू शकता.

या ई-मेल आयडींवर किंवा ट्विटरवर टॅग करून तुम्ही तुमच्या तक्रारी घरबसल्या नोंदवू शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.