Bees On Border : सीमेवर मधमाशाही तैनात केल्या जाणार, गुन्हेगारी रोखण्यासाठी बीएसएफची नवीन योजना नेमकी काय आहे, जाणून घ्या…

मधमाशांचे पोळे तयार करण्याची ही योजना २ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली.

54
Bees On Border : सीमेवर मधमाशाही तैनात केल्या जाणार, गुन्हेगारी रोखण्यासाठी बीएसएफची नवीन योजना नेमकी काय आहे, जाणून घ्या...
Bees On Border : सीमेवर मधमाशाही तैनात केल्या जाणार, गुन्हेगारी रोखण्यासाठी बीएसएफची नवीन योजना नेमकी काय आहे, जाणून घ्या...

भारत-बांगलादेश सीमेवर (Bees On Border) तस्करी आणि इतर गुन्हे रोखण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आणि नवीन पद्धत अवलंबली जात आहे. या प्रयोगाची सुरुवात सर्वप्रथम नादिया जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सुरू करण्यात आली होती. या प्रयोगामुळे सीमेवरील सुरक्षा वाढवण्याकरिता प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती बीएसफच्या (Border Security Forces) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

या प्रकल्पात आयुष मंत्रालयालाची मदत बीएसफने घेतली आहे. या प्रकल्पाकरिता मधमाशांचे पोळे आणि मिश्रधातूंपासून एक कुंपण तयार करण्यात आले आहे. बीएसच्या ३२व्या बटालियनचे कमांडर सुजित कुमार यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, आयुष मंत्रालयाकडून या योजनेसाठी औषधी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ज्या झाडांना येणाऱ्या फुलांकडे मधमाशा मोठ्या प्रमाणात आकर्षित होऊन तिथे पोळे तयार करतील. त्याच भागात एक विशिष्ट प्रकारचे कुंपण तयार करण्यात येते. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसायला मदत होऊ शकते.

(हेही वाचा – Grampanchayat Results: ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी २०२३ )

सुजित कुमार या योजनेबाबत माहिती देताना पुढे म्हणाले की, मधमाशांचे पोळे तयार करण्याची ही योजना २ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली. नदिया जिल्ह्यातील सीमावर्ती भागात सोने, चांदी आणि अंमली पदार्थांची तस्करी यासारख्या गुन्ह्यांचा धोका जास्त आहे. यापूर्वीही तस्करांनी हे कुंपण तोडण्याचा प्रयत्न केल्याची अनेक प्रकरणे येथे उघडकीस आली आहेत. कुंपण तोडण्याचा प्रयत्न करणार्‍या तस्करांना या पोळ्यातील मधमाशा प्रतिबंधक म्हणून काम करतील.

स्थानक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आयुष मंत्रालयाने बीएसएफला तुळशी, एकांगी, सातमुली, अश्वगंधा, कोरफड यासारख्या औषधी वनस्पती पुरवल्या आहेत. सीमा दलाचे जवान स्थानिक लोकांसोबत रोपे लावण्याचे काम करत आहेत. या उपक्रमाला स्थानिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.