Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते घेणार मंत्री उदय सामंत यांची भेट

60
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते घेणार मंत्री उदय सामंत यांची भेट

गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी आज म्हणजेच सोमवार ६ नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यातील एसटी बस सेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यांच्या या आवाहनाला कोणीही पाठिंबा दिला नाही. राज्यतील एसटी बस सेवा आज संपूर्ण व्यवस्थित सुरु आहे.

सविस्तर माहितीनुसार, गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी सातवा वेतन आयोगाच्या मागणीसाठी हे एसटी बंदची मागणी केली होती. तसेच लवकरच सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी आम्ही आंदोलन करू असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार हे आंदोलन सुरु होण्याआधीच सरकारकडून चर्चेसाठी त्यांना बोलावण्यात आलं आहे.

याच पार्श्वभूमीवर आज सदावर्ते (Gunratna Sadavarte) आणि मंत्री उदय सामंत यांची सामंत यांच्या बंगल्यावर भेट होणार आहे. या भेटीनंतर सदावर्ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

(हेही वाचा – Bees On Border : सीमेवर मधमाशाही तैनात केल्या जाणार, गुन्हेगारी रोखण्यासाठी बीएसएफची नवीन योजना नेमकी काय आहे, जाणून घ्या…)

यासर्व घडामोडींवर सदावर्ते (Gunratna Sadavarte) म्हणाले की, “आज एसटीतले कष्टकरी स्टँडबाय आहेत. सध्याचे सरकार हे लोकभिमुख सरकार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी या सरकारकडून धडे गिरवले पाहिजे. ठाकरे सरकारने कर्मचाऱ्यांना कधीही चर्चेला बोलवलं नव्हतं. मात्र आता आंदोलन सुरु होण्याआधीच आताच्या सरकारने बोलवलं आहे.”

हा संप सातवा वेतन आयोग आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी पुकारण्यात आला असल्याचे सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी स्पष्ट केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.