सावधान! ‘वीजबिल भरा…’ असा SMS तुम्हाला तर आला नाही ना…

92

महाराष्ट्रात सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. अलिकडे महावितरण वीजधारकांना अशाच प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर एसएमस (SMS) पाठवून लुबाडण्याचा प्रकार उघडीस आला आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये म्हणून महावितरणकडून निवेदन जारी करण्यात आले आहे.

( हेही वाचा : …तर तुमचेही ‘आधार कार्ड’ ठरणार अवैध! वाचा )

काय आहे प्रकरण?

‘तुमचे महिन्याचे वीचबिल अपडेट नसल्यामुळे तुमची वीज खंडित करण्यात येणार आहे. याकरता ताबडतोब खाली दिलेल्या वैयक्तिक क्रमांकावर संपर्क साधा’ असे बनावट मॅसेज व्हॉट्सअ‍ॅपवर नागरिकांना पाठवण्यात येत आहेत. अशा प्रकारचे कोणतेही मॅसेज महावितरणकडून करण्यात येत नाहीत, त्यामुळे या मॅसेजला कोणचाही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वैयक्तिक व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकांवरून येणारे मॅसेज, पेमेंट लिंक याला कोणताही प्रतिसाद देऊ नये तसेच तक्रार करण्यासाठी महावितरण वीजग्राहकांनी २४ तास सुरू असलेल्या १९१२, १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधा, असेही नागरिकांना सूचित करण्यात आले आहे.

( हेही वाचा : आता लवकरच मेडिकलमध्येही मिळणार कोरोना लस! )

फसवणुकीत वाढ 

सायबर क्राईममध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. अलिकडेच बूस्टर डोस सुरू झाल्यावर नागरिकांना नोंदणी करण्यासाठी फोन आले आणि ओटीपीची विचारणा करून लुबाडण्याचा प्रकार उघडकीस आला होता. यामुळे महाराष्ट्र सायबर विभागानेही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.