कल्याण : प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरसह ठाणे जिल्हावासियांची अर्थात ४० लाखांहून अधिक नागरिकांच्या तहान भागवणाऱ्या बारवी धरणाबत(Barvi Dam)दिलासादायक चित्र समोर आले आहे. रविवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजताच्या आकडेवारीनुसार बारवी धरणाची पातळी ७०.८१ मीटरवर पोहोचली आहे. धरणाची कमाल क्षमता ७२.६० मीटर आहे. सध्या धरणात २८६.५६ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून एकूण क्षमतेच्या ८४.५७ टक्के पाणी भरले आहे.(Barvi Dam)
(हेही वाचा – Ceuta Migration Crisis : युरोपमध्ये खळबळ! ६० हजार स्थलांतरितांच्या घुसखोरीनंतर EU ची ५ ऑगस्टला आणीबाणीची बैठक )
गेल्या २४ तासात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २४.८० मि.मी. पावसाची नोंद झाली. या मोसमात आतापर्यंत एकूण १९८८.४० मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा आकडेवारी वेगळी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाहिल्यास चित्र वेगळे दिसते. २ ऑगस्ट २०२५ रोजी याच दिवशी बारवीची पातळी ७२.०६ मीटर होती. त्यावेळी ३२०.०५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता आणि धरण ९४.४५ टक्के भरले होते. तसेच गेल्या वर्षी या तारखेपर्यंत १९५३.०० मि.मी. पाऊस झाला होता. म्हणजेच यंदा गेल्या वर्षीपेक्षा ३५.४० मि.मी. अधिक पाऊस होऊनही धरणातील पातळी १.२५ मीटरने आणि साठा तब्बल १० टक्क्यांनी कमी आहे. सततच्या पावसामुळे आवक सुरू असली तरी बाष्पीभवन, गळती आणि वापरामुळे अपेक्षित साठा वाढत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.(Barvi Dam)
उन्हाळ्यापर्यंत टंचाई नसली तरीही काटकसर आवश्यक
धरण ८५ टक्क्यांच्या उंबरठ्यावर असल्याने एमआयडीसी प्रशासनाने नागरिकांना दिलासा दिला आहे. सध्या तरी उन्हाळ्यापर्यंत पाणी टंचाईचा प्रश्न नाही. मात्र पाऊस चांगला होऊनही साठा कमी असल्याने प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे, असे आवाहन एमआयडीसी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास बारवी लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिलेल्या आकडेवारीकडे नागरिकांनी लक्ष ठेवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.(Barvi Dam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

