Ayodhya Sri Ram Temple: अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत, जाणून घ्या सध्याच्या ‘या’ १० घडामोडी

३० नोव्हेंबरला पंतप्रधानांच्या जनसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

141
Ayodhya Sri Ram Temple: अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत, जाणून घ्या सध्याच्या 'या' १० घडामोडी
Ayodhya Sri Ram Temple: अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत, जाणून घ्या सध्याच्या 'या' १० घडामोडी

अयोध्येत राम मंदिराच्या (Ayodhya Sri Ram Temple) प्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघा १ महिना उरला आहे, मात्र येथील उत्सवाला दिव्यता आणि अलौकिकत्वाची किनार लाभली आहे. श्रीरामाचे निवासस्थान, अयोध्येचे प्राचीन वैभव येथे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या माध्यमातून पुन्हा आकाराला येणार आहे. अयोध्येतील श्रीराम विमानतळावरूनच विद्युत रोषणाई केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० नोव्हेंबरला अयोध्या विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत.

आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवादरम्यान विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. शहरात चित्ररथ काढून या सोहळ्याची सुरुवात होईल. त्यात भगवान रामाच्या जन्मापासून वनवासापर्यंतची छायाचित्रे असतील. लंकेवर विजय मिळवून भगवान श्रीराम अयोध्येला कसे परतले…याची अनोखी झलकही या सोहळ्यातून अनुभवता येईल.

(हेही वाचा – Parliament MPs Suspension : सरकारच्या विरोधात जंतर मंतरवर विरोधकांचे आंदोलन )

मंदिराच्या बांधकामाविषयी..
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टशी संबंधित असलेले चंपत राय यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, सध्या तळमजल्याचे आणि पहिल्या मजल्याचे काम ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. विद्युत रोषणाईचे काम पूर्ण झाले आहे. निर्धारित वेळेत काम पूर्ण करणे आवश्यक आहे. उर्वरित सर्व कामे ८ दिवसांत पूर्ण होतील.

विमानतळाची सुरुवात
अयोध्येतील श्रीराम एअरपोर्टचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. विमानतळाचे संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरची डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी ३० डिसेंबरला अयोध्येतील विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधीच विमानतळाचे काम नियोजित वेळे आधीच पूर्ण झाले आहे.

रेल्वे स्थानकांवर वर्ल्ड क्लास सुविधा उपलब्ध
अयोध्येत विविध सुविधांनी सुलभ आणि सुसज्ज असे रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. रेल्वे स्थानकावरील फेज १चे काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात रेल्वेकडून २४० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. संकुल 10 हजार चौरस मीटरवर पसरलेले आहे. रेल्वे स्थानकाचे काम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल.

(हेही वाचा – Indian Railway : आतापर्यंत रेल्वेच्या 14 कोटींच्या बेडशीट चोरीला; यापुढे करणार कारवाई)

हॉटेलचे प्रीबुकिंग रद्द
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी अयोध्येत सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढाव घेतला. कोणतीही समस्या टाळण्यासाठी हॉटेलचे सर्व अगाऊ बुकिंग रद्द करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. 22 जानेवारीला राम मंदिरात भगवान राम लल्लाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विशेष निमंत्रित मोठ्या संख्येने येत आहेत.

पंतप्रधान 30 डिसेंबरला भेट देणार
श्री राम जन्मभूमी मंदिराची पायाभरणी करण्यापूर्वी पंतप्रधान 30 डिसेंबर रोजी अयोध्येत पोहोचतील. पंतप्रधानांचा हा दौरा अयोध्येला हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची भेट ठरेल.हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेता, स्थानिक प्रशासनाने भारत सरकारच्या सहकार्याने सर्व आवश्यक तयारी केली पाहिजे. हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेता, स्थानिक प्रशासनाने भारत सरकारच्या सहकार्याने सर्व आवश्यक तयारी केली आहे. धार्मिक महत्त्व लाभलेल्या अयोध्येला पुरातन वैभव पुन्हा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या माध्यमातून केला जाणार आहे. अयोध्या राममय केली जाणार आहे याशिवाय स्थानिक मठ आणि मंदिरांमध्येही सजावट केली जाणार असून भव्य तोरण, कमानींची सजावट केली जाणार आहे. ठिकाणी भजन सरितेचे आयोजनही केले जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

भाविकांची विशेष व्यवस्था
रामपथ, भक्तीपथ, जन्मभूमीपथ आणि धर्मपथ यांच्याशी संबंधित कामे आणि अयोध्या विमानतळावरून बायपासपर्यंत नयघाटला जोडणारा रस्ता गुणवत्ता पूर्ण करून लवकरच पूर्ण केला जाईल.

अयोध्येतील सर्व रस्त्यांची सजावट
पंतप्रधानांच्या आगमनामुळे महामार्गावरून नयाघाटच्या दिशेने आकर्षक फुलांची सजावट केली जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग लखनौ गोरखपूरमधील अयोध्या बायपासच्या रेलिंगला आकर्षक रंग आणि फुलांची सजावट करण्यात येणार आहे. संपूर्ण अयोध्या नगरीची स्वच्छता केली जाईल. अयोध्येत कुठेही धूळ किंवा दुर्गंध नसेल याची काळजी घेतली जाणार आहे.

दीड ते २ लाख नागरिकांचे स्वागत
३० नोव्हेंबरला पंतप्रधानांच्या जनसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसभेला दीड ते २ लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अयोध्येला जोडणाऱ्या प्रमुख मार्गांवर पार्किंग व्यवस्था, डिजिटल टूरिस्ट मॅप विकसित केले जाणार आहे. अयोध्येतील सर्व पायाभूत सुविधा आणि महत्त्वाची ठिकाणे, सर्व भारतीय भाषा आणि भगवान श्रीरामाशी जोडलेल्या प्रमुख देशांची माहिती आहे.

इलेक्ट्रिक बसेसची पर्यायी सुविधा
२२ जानेवारी २०२४ ला भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत करण्यात येणार आहे. याकरिता भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन आधीच व्यवस्था करण्यात येत आहे. भाविकांना विविध पार्किंगमधून अयोध्येत प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल. परस्पर समन्वयाने रेल्वे स्थानक, आरपीएफ, नागरी पोलीस आणि रेल्वे विभागाची सुरक्षा बळकट केली जाईल. परिवहन विभाग पुरेशा संख्येने बसेसची सोयही येते करण्यात येत आहे.

देशाचा मान उंचावणाऱ्यांना आमंत्रण
२२ जानेवारीच्या कार्यक्रमासाठी सर्व परंपरांचे पालन करणाऱ्या साधूसंतांचे तसेच कोणत्याही क्षेत्रात देशाचा मान उंचावणाऱ्यांना या सोहळ्यात आमंत्रित केले जाणार आहे. स्वामी नारायण, आर्ट ऑफ लिव्हिंग, गायत्री कुटुंब, शेतकरी, कला जगतातील प्रमुख व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. देशभरातील सुमारे एकशे पन्नास डॉक्टरांनीही येथे क्रमिक सेवा पुरवण्यासाठी संमती दिली आहे. यादरम्यान शहराच्या कानाकोपऱ्यात लंगर, खाण्यापिण्याची दुकाने, भंडारे, अन्नक्षेत्रे चालवली जाणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.