D. Y. Patil College : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा MBA परीक्षेचा पेपर फुटला

MBA Paper Leak : 22 डिसेंबर रोजी या परीक्षेतील 'लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस' या विषयाचा पेपर फुटला आहे. त्यामुळे विद्यापिठाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

187
D. Y. Patil College : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा MBA परीक्षेचा पेपर फुटला
D. Y. Patil College : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा MBA परीक्षेचा पेपर फुटला

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परीक्षा (Savitribai Phule Pune University) विभागातर्फे एमबीएची परीक्षा चालू आहे. शुक्रवार, 22 डिसेंबर रोजी या परीक्षेतील ‘लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस’ (Legal Aspect of Business) या विषयाचा पेपर फुटला आहे. ऑक्टोबर 2023 या सत्राची परीक्षा 21 नोव्हेंबर पासून सुरु आहे. त्यात MBA अभ्यासक्रमाची परीक्षा 11 डिसेंबरपासून सुरु झाली आहे.

(हेही वाचा – Indian Railway : आतापर्यंत रेल्वेच्या 14 कोटींच्या बेडशीट चोरीला; यापुढे करणार कारवाई)

‘लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस’ या विषयाचा पेपर रद्द

22 डिसेंबर रोजी MBA 2009 रिवाईज प्रथम सत्रातील ‘लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस’ (Legal Aspect of Business) या विषयाची परीक्षा सकाळी 11 वाजता सुरू होणार होती. त्याआधीच या विषयाची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यापिठाने (Savitribai Phule Pune University) ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (MBA Paper Leak)

(हेही वाचा – Parliament MPs Suspension : सरकारच्या विरोधात जंतर मंतरवर विरोधकांचे आंदोलन)

चिखली येथील डी वाय पाटील कॉलेजमधून फुटली प्रश्नपत्रिका

एमबीए प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राचा हा पेपर होता. चिखली येथील डी वाय पाटील (D. Y. Patil College) कॉलेजमधून प्रश्नपत्रिका फुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या (Savitribai Phule Pune University) परीक्षा विभागातर्फे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या ३ जिल्ह्यांमध्ये संलग्न महाविद्यालयातील सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते.

२६ डिसेंबर रोजी पुन्हा होणार परीक्षा

या विषयाची परीक्षा २६ डिसेंबर राेजी सकाळी १० ते १२.३० या कालावधीत घेण्यात येणार असल्याचा निर्णय विद्यापिठाने घेतला आहे. सकाळी ११ वाजता पेपर सुरु होणार होता. पण त्याअगोदर पेपर फुटल्याचे निदर्शनास आल्याने पेपर रद्द करण्यात आला.

(हेही वाचा – Sharad Ponkshe : बिचाऱ्या राहुल गांधीला सावरकर समजलेलेच नाहीत; शरद पोंक्षे यांचा निशाणा)

दाेषींवर नियमानुसार कारवाई करणार – डाॅ. महेश काकडे

एम.बी.ए. प्रथम सत्राच्या लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस या विषयाची प्रश्नपत्रिका शुक्रवारी परीक्षा सुरू हाेण्यापूर्वी समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याचे दिसून आले. चिखलीतील डी.वाय. पाटील काॅलेजमधून प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. परीक्षा प्रमाद समितीसमाेर या प्रकरणाची चाैकशी हाेईल तसेच दाेषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील (Savitribai Phule Pune University) परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. महेश काकडे यांनी कळवले आहे. (D. Y. Patil College)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.