Sharad Ponkshe : बिचाऱ्या राहुल गांधीला सावरकर समजलेलेच नाहीत; शरद पोंक्षे यांचा निशाणा

सावरकरांबाबत जेवढे बेताल व वादग्रस्त वक्तव्य कराल, तेवढे सावरकर वाचले जातील, असे उद्गार Sharad Ponkshe यांनी काढले आहे.

124
Sharad Ponkshe : बिचाऱ्या राहुल गांधीला सावरकर समजलेलेच नाहीत; शरद पोंक्षे यांचा निशाणा
Sharad Ponkshe : बिचाऱ्या राहुल गांधीला सावरकर समजलेलेच नाहीत; शरद पोंक्षे यांचा निशाणा

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या बिचाऱ्या राहुल गांधीला (Rahul Gandhi) सावरकर समजलेलेच नाहीत. तो वेडसर आहे. सावरकर समजून घ्यायचे असतील, तर राहुल गांधींनी माझ्या व्याख्यानाला यावे, असे विधान ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी केले आहे. नागपूर येथे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ (Me Nathuram Godse Boltoy), या नाटकाच्या निमित्ताने शरद पोंक्षे हे बोलत होते.

(हेही वाचा – Eastern Freeway Tunnel : ईस्टर्न फ्री वे मार्गावरील बोगदा गळतीमुक्त)

शरद पोंक्षे पुढे म्हणाले की, ”सावरकरांबद्दल बोलायला उंची लागते. सावरकर कळत नाही किंवा केवळ विरोध करायचा; म्हणून राहुल गांधी सावरकरांबद्दल बेताल वक्तव्य करत असतात. त्याला कोणीतरी समजून सांगायला पाहिजे, नाहीतर त्याने माझ्या व्याख्यानाला यावे आणि सावरकर (Veer Savarkar) समजून घ्यावेत. अनेकदा त्यांचे व्यक्तव्य हे राजकीय स्वार्थासाठी असू शकते.”

… तेवढे सावरकर वाचले जातील

”सावरकरांबाबत जेवढे बेताल व वादग्रस्त वक्तव्य कराल, तेवढे सावरकर वाचले जातील. आपण महापुरुषाची व्यक्ती म्हणून पूजा करता. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक महामानव आहेत. आपण त्यांना देव बनवून पूजा करत असतो. त्यांची नकारात्मक बाजू दाखवली की, मारामारी व हिंसा करतो. हे टाळले पाहिजे”, असा सल्ला देखील शरद पोंक्षे यांनी दिला आहे.

(हेही वाचा – Bank Fraud Case: कॉंग्रेस नेते सुनिल केदार नागपूर जिल्हा बँक घोटा प्रकरणी दोषी, १५० कोटींचा घोटाळ्याचा १२ वर्षांनी निर्णय )

ते गांधी नाही अन् सावरकर पण नाही

”एक तर तू गांधी (Rahul Gandhi) नाही अन् सावरकर (Veer Savarkar) पण नाही. हे ओरिजनल गांधी नसून, खान आहेत. ते महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) वंशज नाहीत. त्यांनी त्यांच्या आडनावाचा फायदा घेतला. ही फिरोज खान यांची पुढची पिलावळ असून, हाच त्यांचा इतिहास आहे”, अशा शब्दांत शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा समाचार घेतला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.