Ayodhya Rammandir : रामलल्ला अवतरले; शुभमुहुर्तावर संपन्न झाली रामलल्लाची प्रतिष्ठापना

119
Ayodhya Rammandir : रामलल्ला अवतरले; शुभमुहुर्तावर संपन्न झाली रामलल्लाची प्रतिष्ठापना
Ayodhya Rammandir : रामलल्ला अवतरले; शुभमुहुर्तावर संपन्न झाली रामलल्लाची प्रतिष्ठापना

२२ जानेवारी या शुभदिनी अयोध्येत साक्षात वैकुंठ अवतरले आहे. (Ayodhya Rammandir) अयोध्या नगरी नववधूसारखी सजली आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रामभक्तांची ५०० वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली. अत्यंत मंगलमय वातावरणात आणि वेद-मंत्रांच्या घोषात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते रामलल्लाच्या दिव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. (ram lala mandir ayodhya)

WhatsApp Image 2024 01 22 at 12.36.33 PM

(हेही वाचा – Ayodhya Pran Pratishtha : कॅनडामध्ये २२ जानेवारी हा दिवस ‘विशेष दिवस’ म्हणून जाहीर)

अभिजित मुहूर्तावर झाली प्रतिष्ठापना

अभिजित मुहूर्तावर शास्त्रीय परंपरेचे पालन करून प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे. 22 जानेवारी रोजी अभिजात मुहूर्तावर दुपारी 12:29 वाजून 8 सेकंद ते 12:30 मिनिटे 32 सेकंदापर्यंत ही प्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी गर्भगृहात सरसंघचालक मोहन भागवत, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath), राज्यपाल आनंदीबेन पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. (shree ram mandir ayodhya)

16 जानेवारीपासून मंदिरात विविध विधी चालू आहेत. अभिजीत मुहूर्त मृगाशिरा नक्षत्रात दुपारी 12:20 वाजता प्रभु रामललाचा अभिषेक करण्यात आला.

ज्याप्रमाणे अयोध्येत दीपोत्सवाच्या शुभमुहूर्तावर मंदिराची सजावट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रभू रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या वेळी अयोध्येतील सर्व मठ मंदिरांनाही विशेष फुलांनी सजवण्यात आले आहे.

मैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी भगवान रामाची ऐतिहासिक मूर्ती तयार केली आहे. नवीन 51 इंचाची मूर्ती गुरुवारी मंदिराच्या गर्भगृहात विराजमान करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.