Asaram Bapu यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; अंतरिम जामीन अर्ज फेटाळला, पण ‘या’साठी दिली परवानगी

66
Asaram Bapu in a wheelchair surrounded by people.
Asaram Bapu faces a setback from the Supreme Court.

जोधपुरमधील नाबलिग मुलीवर अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची (Life imprisonment) शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी ०५ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court Order) आरोग्याच्या कारणास्तव दाखल केलेला त्याचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच त्यांची वाढतं वय आणि ढासळती प्रकृती लक्षात घेता, तुरुंगातच स्वतःच्या पसंतीचा २४ तास प्रशिक्षित काळजीवाहू (Caretaker) ठेवण्यास न्यायालयाने संमती दिली आहे.  (Asaram Bapu )

(हेही वाचा – India vs SL, Test Series : साई सुदर्शन सराव सामन्याला मुकणार, पहिल्या कसोटीआधी लंकेत पोहोचण्याचा विश्वास)

वैद्यकीय अहवालाच्या आधारे न्यायालयाचा निर्णय
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. एम. सुंदरेश आणि न्यायाधीश पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) या संस्थेच्या वैद्यकीय अहवालाची पाहणी केली. या अहवालात आसारामला सध्या रुग्णालयात दाखल करण्याची तातडीची गरज नसल्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु, त्याला सातत्याने वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता भासू शकते, असेही अहवालात स्पष्ट केले होते. त्यामुळे न्यायालयाने जामीन फेटाळताना, भविष्यात प्रकृती अधिक बिघडल्यास पुन्हा अर्ज करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.

(हेही वाचा – National Handloom Day : विविध धाग्यांत विणलेला भारत, नाबार्डकडून वीणकरांना उभारी देण्यासाठी ३ दिवसांचं खास हातमाग प्रदर्शन)

जामीन अर्जाला राज्य सरकारचा तीव्र विरोध
या सुनावणीदरम्यान राजस्थान सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी जामीन अर्जाला जोरदार विरोध दर्शवला. यापूर्वी अंतरिम सवलत मिळाली असताना आसारामने धार्मिक स्थळांना भेट दिल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असतानाही उच्च न्यायालयात पॅरोलसाठी अर्ज केल्याची बाब त्यांनी उपस्थित केली. २०१३ च्या जोधपूर आश्रम प्रकरणाशी संबंधित असलेल्या या प्रकरणात उच्च न्यायालयाने यापूर्वीच त्याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.