Artificial Lakes : मुंबईत यंदा आणखी २९ नवीन कृत्रिम तलावांची संख्या वाढली, यंदा १९१ तलावांची सुविधा

नव्याने बनवलेल्या तलावांची आकडेवारी पाहता यंदा मुंबईतील ५० नवीन ठिकाणी कृत्रिम तलाव बनवण्यात आले आहे

118
Artificial Lakes : मुंबईत यंदा आणखी २९ नवीन कृत्रिम तलावांची संख्या वाढली, यंदा १९१ तलावांची सुविधा
Artificial Lakes : मुंबईत यंदा आणखी २९ नवीन कृत्रिम तलावांची संख्या वाढली, यंदा १९१ तलावांची सुविधा

विशेष प्रतिनिधी,मुंबई

गणेशोत्सवामध्ये समुद्र चौपाटींसह तलावांमध्ये जलप्रदुषण होऊ नये म्हणून पर्यावरण पुरक गणेश मूर्तींचे विसर्जन व्हावे म्हणून महापालिकेच्यावतीने कृत्रिम तलावांची (Artificial Lakes) निर्मिती करण्यात येत आहे. यंदा मुंबईत १९१ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली असून मागील वर्षींच्या तुलनेत यंदा २९ नवीन कृत्रिम तलावांची संख्या वाढली आहे. तर मागील वर्षी निर्मिती केलेल्या कृत्रिम तलावांपैंकी १८ तलावांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कमी झालेल्या तलावांच्या संख्येतील वजावट आणि नव्याने बनवलेल्या तलावांची आकडेवारी पाहता यंदा मुंबईतील ५० नवीन ठिकाणी कृत्रिम तलाव (Artificial Lakes) बनवण्यात आले आहे.

मुंबईत गणेश विसर्जनासाठी ७३ विसर्जनस्थळे असून तर सन २०२०मध्ये १५२ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती.  तर सन २०२१ मध्ये १७३ कृत्रिम तलावांची व्यवस्था केली होती. तर मागील वर्षी म्हणजे सन २०२२च्या गणेशोत्सवामध्ये १६२ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. तर यावर्षी म्हणजे २०२३च्या उत्सवाकरता महापालिकेने १९१ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. यंदा प्रथमच महापालिकेच्या ए विभागात ३ नव्याने कृत्रिम तलाव (Artificial Lakes) बनवण्यात आले असून घाटकोपरमध्येही यंदाही सहा नव्याने कृत्रिम तलाव बनवण्यात आले आहेत.  तर डि विभागात सात,  ई विभागात १०, एफ दक्षिण विभागात ४, एल विभागात ३, आर उत्तर विभागात २, एस विभागात ९ अशाप्रकारे  कृत्रिम तलावांची संख्या वाढलेली आहे. तर जी दक्षिण विभागात ५,  एच पूर्व विभागात ९, के पश्चिम विभागात ३ पी दक्षिण विभागात एक अशाप्रकारे १८ कृत्रिम तलावांची संख्या कमी झाली आहे.

(हेही वाचा-Ganeshotsav 2023 : मुंबई, पुणे आणि कोकणासह संपूर्ण राज्यात श्री गणेशाचे उत्साहात स्वागत)

मागील वर्षी सन २०२२च्या उत्सवामध्ये एकूण १ लाख ९३ हजार ६२ गणेश मूर्तींपैकी ६६ हजार १२७ मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम  तलावांमध्ये पार पडले होते. तर सन २०२१ मध्ये विसर्जित झालेल्या एकूण १ लाख ६४ हजार ७६१  गणेश मूर्तींपैंकी  ७९ हजार १२९ गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये (Artificial Lakes) पार पडले होते, तर त्या आधीच्या म्हणजे सन २०२०मध्ये एकूण १ लाख ३५ हजार ५१५ मूर्तींपैंकी  ६८,११९ मूर्तींचे तर कोविड पूर्वी म्हणजे सन २०१९मध्ये एकूण १ लाख ९६ हजार ४८३ पैंकी ३३,२१७ मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये झाले.

कोविडपूर्वी केवळ ३४ कृत्रिम तलावांची (Artificial Lakes) निर्मिती करण्यात आली होती. परंतु कोविडमध्ये ही संख्या मोठ्या संख्येने वाढली. परंतु कोविडमध्ये ज्याप्रकारे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यावर भाविकांचा कल होता, त्यामुळे आता पुन्हा एकदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवली गेल्याने पुन्हा एकदा भाविकांचा कल वाढेल अशी शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.