Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त

17

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सुमारे 14 हजार पोलीस तैनात करण्यात आली आहेत. गणेशोत्सव Ganeshotsav 2023 काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांसह गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा आणि संवेदनशील ठिकाणी साध्या वेशातील गस्तीसोबतच सीसीटीव्ही कॅमेरे, टेहळणी मनोऱ्यांच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाणार आहे.

मुंबईतील प्रख्यात गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात, तसेच प्रतिष्ठित व्यक्तीही या गणपतींच्या दर्शनासाठी येतात. गणेशोत्सव Ganeshotsav 2023 काळात खरेदीसाठी बाजारपेठाही गजबजलेल्या असतात. त्यामुळे अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. मेटल डिटेक्टर, श्वान पथक, बॉम्बशोधक व नाशक पथकांच्या माध्यमातूनही संवेदशील ठिकाणांची नियमित तपासणी करण्यात येत आहे.

(हेही वाचा Women’s Reservation Bill : नव्या संसद भवनात प्रवेश; पहिल्या भाषणात पंतप्रधानांकडून महिला आरक्षण विधेयकाची घोषणा)

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती हे स्वत: सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख ठेवणार आहेत. मुंबई पोलीस दलातील साहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे मिळून 2024 अधिकारी व 11 हजार 726 पोलीस अंमलदार बंदोबस्तात तैनात असतील. 15 उपायुक्त स्थानिक पातळीवर बंदोबस्तांचे नियोजन करणार आहेत. पोलिसांच्या दिमतीला केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या तुकडय़ा तैनात ठेवण्यात आल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.