नियम मोडणाऱ्या ४ हजार २७७ खासगी बसवर कारवाई; १.८३ कोटींचा दंड वसूल

112
नियम मोडणाऱ्या ४ हजार २७७ खासगी बसवर कारवाई; १.८३ कोटींचा दंड वसूल
नियम मोडणाऱ्या ४ हजार २७७ खासगी बसवर कारवाई; १.८३ कोटींचा दंड वसूल

राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांतील ‘वायुवेग’ पथकांमार्फत १४ हजार १६१ खासगी बसेसची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ४ हजार २७७ खाजगी बसेस नियम मोडत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर कारवाई करीत १ कोटी ८३ लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

तपासणी दरम्यान रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादी गुन्ह्यांसाठी सर्वात जास्त १ हजार ७०२ बसेस वर कारवाई करण्यात आली. विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणाऱ्या ८९० बसेसवर, योग्यता प्रमाणपत्र वैध नसलेली ५७० खासगी बसेसवर, तर ५१४ बसेसमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे आढळून आले असून त्यावर कारवाई करण्यात आली.

शासनाने विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी प्रवासी बसेसची व इतर गुन्ह्यांबाबत तपासणी करण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी १६ मे ते ३० जून २०२३ दरम्यान विशेष मोहीम राबविली. त्याअंतर्गत बसेसची तपासणी करताना विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र वैध नसणे, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादींमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर भरल्याची खात्री करणे, जादा भाडे आकरणे, अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणे, आपत्कालीन परिस्थितीत निर्गमन दर आणि इतर दरवाजे कार्यरत स्थितीत आहेत काय आदी बाबींची राज्यभर व्यापक तपासणी करण्यात आली. त्यानंतर उक्त नमूद विविध गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या बसेसवर कारवाई करण्यात आली.

(हेही वाचा – सहायक आयुक्त पदी कार्यकारी अभियंता नव्हे तर उपप्रमुख दर्जाचे अधिकारी : नवीन पेच झाला निर्माण)

विविध गुन्ह्यांसाठी कारवाई

मोटार वाहन कर न भरणाऱ्या ४८५ बसेस, आपत्कालीन दरवाजा कार्यरत स्थितीत नसणाऱ्या २९३, अवैधरित्या व्यवसायिक पद्धतीने माल वाहतूक करणाऱ्या २२७, आसन क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या १४७, वेग नियंत्रक बसविणे व ते कार्यरत असणे आवश्यक असतांना वेग नियंत्रक नसणारी ७२, जादा भाडे आकारणी करणाऱ्या ४० बसेस व इतर गुन्ह्यांमध्येसुद्धा विशेष तपासणी मोहिमेच्या कालावधीत खासगी बसेसवर परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.