वाहनाची दुचाकीला धडक, दोन तरुण जागीच ठार

106

भाऊबीजेच्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या पिंपळगाव देपा शिवारात अपघात झाला आहे. दुचाकीवरुन जाणा-या दोन तरुणांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत या दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुपारी साडे बाराच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दोन तुरुणांचा जागीच मृत्यू

संगमनेर ते साकुर रोडवर एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवर असणा-या ओम पेंडभाजे(19) आणि शुभम टेकुडे(18) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोन्ही तरुण बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरुन संगमनेरकडे जात होते. यावेळी त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी या दोघांनाही उपचारांसाठी संगमनेर येथे नेले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले, आरगाव पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.

(हेही वाचाः तारापूर औद्योगिक वसाहतीत भीषण स्फोट, तीन कामगारांचा मृत्यू, 10 जखमी)

घारगाव पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक एस.एस.सातपुते,पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण,हरिश्चंद्र बांडे,संतोष फड यांनी या अपघाताची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करत पोलिसांनी घटनेची माहिती दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.