वडनगरच्या भूमीतून विकसित भारताचा संकल्प; DCM Eknath Shinde यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या सेवायात्रेचा गौरव

17
वडनगरच्या भूमीतून विकसित भारताचा संकल्प; DCM Eknath Shinde यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या सेवायात्रेचा गौरव
  • प्रतिनिधी

DCM Eknath Shinde            गुजरातमधील वडनगर या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मभूमीतून राष्ट्रव्यापी ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त आणि सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेला अभिवादन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, भाजपा प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा, हेमांग जोशी यांच्यासह खासदार, आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने मोदी यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. (DCM Eknath Shinde)

वडनगरच्या पवित्र भूमीत येणे हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या भूमीला नमन केले. वडनगरच्या मातीतून उमटलेला एका बालकाचा आवाज आज देशातच नव्हे, तर जगभर घुमत असल्याचे त्यांनी नमूद केले. वडनगर ते वाराणसी हा प्रवास केवळ भौगोलिक अंतर पार करणारा नसून सेवेपासून समर्पण, संकल्पापासून परिवर्तन आणि परिवर्तनापासून विकसित भारताकडे जाणारी वाटचाल असल्याचे शिंदे म्हणाले. (DCM Eknath Shinde)

पंतप्रधान मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या प्रवासात पदे आणि जबाबदाऱ्या बदलल्या; मात्र जनसेवेचा संकल्प कायम राहिला, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. एनडीएच्या बैठकीत अमित शाह यांनी मोदी यांचा जन्मदिन व्यापक स्वरूपात साजरा करून सरकारी योजनांचा लाभ प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले होते. त्याच भावनेतून ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (DCM Eknath Shinde)

(हेही वाचा – १५ मिनिटं पुस्तक वाचलं की मिळणार पैसे! काय आहे Singapore सरकारची ही भन्नाट योजना?)

पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचा गौरव करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील विविध योजनांचा उल्लेख केला. गॅस जोडणी, पक्की घरे, बँक खाती आणि नळाद्वारे पाणीपुरवठा यांसारख्या योजनांमुळे विकास सामान्य नागरिकांच्या जीवनाशी जोडला गेला आहे. सरकारी योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या जीवनात पोहोचल्या, तरच त्यांची खरी सार्थकता ठरते, असे त्यांनी नमूद केले. (DCM Eknath Shinde)

भारताची अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचली असून तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी देशातील उद्योग, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाला चालना मिळत असल्याचे सांगितले. कलम ३७० हटविणे, देशाची सुरक्षा आणि भारतीय लष्कराची क्षमता यामुळे नव्या भारताची निर्मिती होत असल्याचेही ते म्हणाले. (DCM Eknath Shinde)

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका वाढत असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी BRICS, ग्लोबल साऊथ, डिजिटल तंत्रज्ञान, योग आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा उल्लेख केला. विविध देशांनी पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले असून हा १४० कोटी भारतीयांचा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले. राम मंदिर, काशी विश्वनाथ धाम आणि विविध तीर्थक्षेत्रांचा विकास करताना कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानासोबत भारतीय संस्कृती, मूल्ये आणि मानवी भावना जपल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (DCM Eknath Shinde)

(हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर CM Devendra Fadnavis यांचा थेट जिव्हारी लागणारा वार; मराठवाड्यात नेमकं काय घडलं?)

एम. के. गांधी आणि सरदार पटेल यांच्या गुजरातमधून स्वातंत्र्याचा संकल्प जनआंदोलनात परिवर्तित झाला. त्याच भूमीतून पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारताचा संकल्प राष्ट्रीय ध्येय बनविल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आर्थिकदृष्ट्या मजबूत, तंत्रज्ञानसक्षम, आत्मनिर्भर आणि सुरक्षित भारत घडविण्यासोबतच गरीब, युवक आणि महिलांना संधी देणे हे या ध्येयाचे महत्त्वाचे भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. वडनगरची ठिणगी आज भारताच्या परिवर्तनाची प्रेरणा बनली असून २०४७ च्या विकसित भारताचा आवाज बनेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे आणि देशसेवेसाठी त्यांना अधिक शक्ती मिळावी, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. (DCM Eknath Shinde)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेला अभिवादन करण्यासाठी गुजरातमधील वडनगर येथून राष्ट्रव्यापी ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करण्यात आले. २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या संकल्पाला जनसेवेची जोड देत या अभियानाच्या माध्यमातून सरकारी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला. (DCM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.