Aadhar : पुण्यात 91 हजार विद्यार्थी बिना ‘आधार’

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आरटीई प्रवेश, पोषण आहार, पाठ्यपुस्तके, गणवेश वाटप यांसह अन्य योजनांचा पारदर्शकपणे लाभ देता यावा, यासाठी इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करावीच लागते.

127
पुण्यात 91 हजार विद्यार्थी बिना 'आधार'
पुण्यात 91 हजार विद्यार्थी बिना 'आधार'

पुणे जिल्ह्यात तब्बल 91 हजार 948 विद्यार्थ्यांनी आधार नोंदणी केली नाही. तर, 4 लाख 22 हजार 821 विद्यार्थ्यांच्या आधारचा डेटा जुळलेला नसल्याचे समोर आले आहे. आता शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघा महिना शिल्लक असून, कासवगतीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे.

पुणे जिल्ह्यात 19 लाख 60 हजार 500 विद्यार्थी असून यातील 18 लाख 68 हजार 552 विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झालेली आहे. हे प्रमाण जवळपास 78 टक्के आहे. त्यामुळे आणखी 22 टक्के विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आरटीई प्रवेश, पोषण आहार, पाठ्यपुस्तके, गणवेश वाटप यांसह अन्य योजनांचा पारदर्शकपणे लाभ देता यावा, यासाठी इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करावीच लागते. राज्यातही आतापर्यंत 22.59 टक्के काम बाकी आहे. प्रामुख्याने स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यातील 3 लाख 93 हजार विद्यार्थ्यांनी आधार कार्डच काढले नसून, 48 लाख विद्यार्थ्यांचा आधारबाबतचा डेटा अजूनही जुळत नसल्याची उघडकीस आले आहे.

(हेही वाचा The Kerala Story : चित्रपटातील कथानक माझ्याही आयुष्याशी जुळणारे, हिंदू धर्माबद्दल अज्ञानामुळे केले धर्मांतर; सांगतेय अनघा… )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.