72 hoorain : दहशतवाद्यांचा पर्दाफाश करणा-या ’72 हुरें’चा रिलिजच्या आधीच बोलबाला; कमाईच्या बाबतीत ‘दंगल’लाही टाकले मागे!

'72  हुरें' या चित्रपटाचा रविवारी 4 जून रोजी टीझर प्रदर्शित करण्यात आला होता.

185

संजय पूरण सिंह दिग्दर्शित ’72 हुरें’या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचा विषय नक्की काय असेल याची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. हा चित्रपट येत्या 7 जुलै 2023 रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या बाबतीत एक खास गोष्ट घडली आहे. ’72 हुरें’ या चित्रपटाने रिलिजच्या आधीच काही मोठ्या चित्रपटांच्या IMDb रेटिंगमध्ये बाजी मारली आहे. अमिर खानचा दंगल, केजीएफ 2, आरआरआर, बाहुबली 2 आणि द केरला स्टोरी अशा मोठ्या चित्रपटांना मागे सारत  ’72 हुरें’ या चित्रपटाने IMDb वर 8.5 रेटींग मिळवत आपली जागा पक्की केली आहे. परंतू या चित्रपटाला विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’च्या पुढे काही जाता आले नाही. कारण ‘द कश्मीर फाइल्स’ची रेटींग IMDb 8.7 इतकी आहे.

(हेही वाचा 72 Hoorain : ‘द केरला स्टोरी’ नंतर आता आणखी एक ‘ब्रेनवॉश’ दाखवणारा चित्रपट येतोय ‘७२ हूरें’)

’72  हुरें’ या चित्रपटाचा रविवारी 4 जून रोजी टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. टीझरमध्ये 2011 साली अमेरिकेच्या जागतिक रेल्वे केंद्रामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार ठरलेला ओसामा बिन लादेनपासून, मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्यात पकडला गेलेला अजमल कसाब, 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी असणारा याकुब मेनन, 1999 च्या दिल्ली विमान अपहरण प्रकरणातील आरोपी मसूद अझहर आणि 2006 च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटातील आरोपी हाफिज सईद यांच्यासह अनेक दहशतवाद्यांना 72 जणांना भेटण्यासाठी दहशतवादी बनण्यास सांगण्यात आले होते, असे या टीझरमधून दिसत आहे.

या चित्रपटाला 2019 साली गोव्यात पार पडलेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या भारतीय पॅनोरामा विभागात दाखविण्यात आले होते. गुलाब सिंह तंवर, किरण डागर, अनिरुद्ध तंवर, अशोक पंडित या चित्रपटाचे प्रोड्युसर आहेत. या चित्रपटात पवन मल्होत्रा आणि आमिर बशीर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.