Dada Bhuse : बसस्थानकांच्या नुतनीकरणासाठी ६०० कोटी; दादा भुसे यांची विधानसभेत माहिती

विभागाला मिळालेल्या निधीतून ७२ बसस्थानकांचे काम पूर्ण करण्यात आले असून ७० ठिकाणी कामे प्रगतीपथावर आहेत.

148
Dada Bhuse : बसस्थानकांच्या नुतनीकरणासाठी ६०० कोटी; दादा भुसे यांची विधानसभेत माहिती
Dada Bhuse : बसस्थानकांच्या नुतनीकरणासाठी ६०० कोटी; दादा भुसे यांची विधानसभेत माहिती

राज्यातील बसस्थानकांचा कायापालट करण्यासाठी एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्यात ६०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या निधीपैकी ५०० कोटी रुपये हे १९३ बसस्थानकांच्या काँक्रीटीकरणावर तर बसस्थानकाची रंगरंगोटी आणि इतर किरकोळ दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपये खर्च केले जातील, अशी माहिती प्रभारी परिवहन मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मंगळवारी (१९ डिसेंबर) विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. (Dada Bhuse)

काँग्रेसच्या लहू कानडे यांनी राज्यातील बसस्थानकांची दुरुस्ती आणि अद्ययावत सुविधा याबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना भुसे (Dada Bhuse) यांनी बांधा, वापरा आणि हस्तांतर करा अर्थात बीओटी (BOT) तत्वावर ४५ बसस्थानकांचा विकास करण्यात आला आहे. विभागाला मिळालेल्या निधीतून ७२ बसस्थानकांचे काम पूर्ण करण्यात आले असून ७० ठिकाणी कामे प्रगतीपथावर आहेत. चालू वर्षात बसस्थानकांच्या नुतनीकरणासाठी ४०२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती भुसे (Dada Bhuse) यांनी दिली. (Dada Bhuse)

(हेही वाचा – Nirmala Sitharaman: गुगल प्ले स्टोअरवरून २,५०० अॅप्स काढून टाकले, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती; कारण वाचा सविस्तर…)

बीओटी तत्वावर (BOT) १८६ बसस्थानकांचा विकास प्रस्तावित आहे. यापैकी ४० ठिकाणी निविदा काढण्यात आल्या. यातील दोन निविदांना प्रतिसाद मिळाला. बीओटीचा ३० वर्ष भाडेपट्टीचा कालावधी कमी असून तो वाढवावा, अशी सूचना पुढे आली आहे. त्यामुळे यासंदर्भात निवृत्त सचिव सुबोधकुमार यांची समिती नेमण्यात आली असून या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर बीओटीतील त्रुटी दूर केल्या जातील, असे भुसे (Dada Bhuse) यांनी सांगितले. (Dada Bhuse)

तत्पूर्वी लहू कानडे यांनी श्रीरामपूर बसस्थानकाच्या दूरवस्थेची व्यथा मांडली. बसस्थानकाच्या शेजारी असलेल्या रस्त्याची उंची वाढल्याने बसस्थानकाची जागा खोल झाली आहे. येथे पावसात पाणी तुंबते. या बसस्थानकाला लागून असलेली आठ एकरची जागा आणि सध्याच्या बस स्थानकाची जागा एकत्र करून तीचा बीओटी तत्वावर विकास करण्यासाठी आपण राज्य सरकारला आराखडा सादर केला आहे. मात्र, सरकारने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे सांगत कानडे यांनी श्रीरामपूर स्थानकाचा बीओटी (BOT) तत्वावर विकास करण्याची मागणी केली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाच्या रत्नाकर गुट्टे, भाजपच्या मनीषा चौधरी, शिवसेनेच्या प्रकाश आंबिटकर यांनी उपप्रश्न विचारले. (Dada Bhuse)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.