Sharmila Thackeray : मी पुतण्यावर विश्वास दाखवला, उद्धव ठाकरेंनी भावावर दाखवायला हवा होता; शर्मिला ठाकरेंनी सुनावले

218
सध्या दिशा सालियन प्रकरण संशयित मृत्यू प्रकरण गाजत आहे. कारण राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावरही संशय आहे. अशा वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी आदित्य ठाकरे असे करेल असे वाटत नाही, असे म्हटले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यावरून शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले. मात्र त्यावर शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलेच सुनावले.

काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे? 

मला वाटते असे आभार मानायची संधी उद्धव ठाकरेंनी मला आयुष्यात कधीच दिली नाही. किणी केस झाली, तेव्हापासून आतापर्यंत जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा ते फक्त चिमटेच काढत असतात. किमान जो भाऊ तुमच्यासोबत लहानाचा मोठा झाला, त्याच्यावर थोडा तरी विश्वास दाखवला असता, तर आम्हाला कधीतरी आभार मानायची वेळ आली असती. जे आता त्यांना मानावे लागतात. मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला, ज्या भावासोबत तुम्ही लहानाचे मोठे झालात, त्याला किणी केसच्या वेळी काय मदत केलीत? आजपर्यंत टोमणे देणे त्यांनी कधी थांबवले आहे? कुठचीही वेळ आली की किणी केसवरुन टोमणे देतात. तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा, मग आम्हीपण आभार मानू, असेही शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.