कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) विस्ताराची कोकणवासी गेली अनेक वर्ष प्रतीक्षा करत आहेत. आता कोकणवासियांचे स्वप्न सत्यात उतरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणावर काम सुरू होणार आहे. तब्बल 263 किलोमीटर लांब मार्गावर दुपदरीकरण, तीन नवीन रेल्वे स्थानक आणि अतिरिक्त लूप मार्गांचा विकास करण्याची योजना आहे. यामुळे कोकण रेल्वेचा महाविस्तार होणार आहे.
नेमका प्रकल्प काय?
कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) विस्तारासाठी पाच वर्षीय प्लॅन तयार केला गेला आहे. यासाठी एकूण ४७०.०८ कोटींचा खर्च अपेक्षित असून रेल्वे बोर्डाकडे याचा प्रस्ताव पाठवला आहे. रायगड जिल्ह्यातील रोह्यापासून ते कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ठोकूरदरम्यान ७४० किमी लांब मार्गावरील कोंडी फोडण्याच्या हेतूने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ठोकूर ते मुकंबिका रोड-ब्यनदूर या मार्गावर ११२ किमी तर वैभववाडी ते माजोर्डा या मार्गावर १५१ किमी असे एकत्र २६३ किलोमीटर मार्गावर दुपदरीकरण करण्यात येणार आहे. रोहा-मडगाव पट्ट्यावर क्षमतेपेक्षा १४३ टक्के तर मडगाव ते ठोकूर पट्ट्यावर क्षमतेपेक्षा १२८ टक्के अधिक प्रवासी प्रवास करतात, असे सर्वेक्षणात समोर आले होते. त्यामुळे या मार्गाचे दुपदरीकरण करण्याची योजना तयार केली. या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला असून जून २०३० पर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आतापर्यंत कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावर केवळ ५४.६६ किमी मार्गांचे दुपदरीकरण करण्यात आले आहे.
(हेही वाचा Ind W vs Pak W, T20 WC Match : हरमनप्रीतचाही पाक खेळाडूंशी हस्तांदोलनास नकार; पाकशी ‘नो हँडशेक’ धोरण सुरूच)
तीन नवीन स्थानके कुठे?
मायेम, मुकंबिका रोड-ब्यनदूर आणि न्यूरा-ओ-ग्रान्डे या ठिकाणी तीन नवी क्रॉसिंग स्थानके बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यासह गोकर्णा मार्ग, होन्नावर,बरकूर, उडुपी, अंकोला या ठिकाणी लूप मार्गिका तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी एकूण ६९६.७७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरील गर्दी आणि कोंडी कमी करण्यात यश येण्याची शक्यता आहे. याशिवाय या मार्गावर ११ लेवल-क्रॉसिंग गेट, ४८ स्थानकांवर विद्युत इंटरलॉकिंग प्रणाली आणि कवच प्रणालीही विकसित केली जाणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
Join Our WhatsApp Community

