अबब…इटलीहून आलेले विमान होते कोरोना स्प्रेडर! कारण…

49

देशात सध्या कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशाही परिस्थितीत आंतरराष्ट्रीय विमान प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्याचा पहिला झटका भारताला बसला आहे. इटलीहून भारतात आलेल्या विमानात तब्बल 125 प्रवासी कोरोना बाधित निघाले आहेत. ही बाब अत्यंत धक्कादायक असून भारतात आलेल्या या सर्व प्रवाशांना विमानतळावरच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. एकाच विमाातून हे सर्व प्रवासी भारतात आले आहेत.

या विमानात एकूण 179 प्रवासी होते. अमृतसरमध्ये विमान उतरल्यानंतर त्या सर्वांची कोरोना चाचणी कऱण्यात आली. या चाचणीमध्ये 179 पैकी 125 प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. त्यानंतर मात्र यंत्रणेची तारांबळ उडाली. या सर्व प्रवाशांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आले. सुरुवातीला इटलीहून अमृतसरला आलेले हे विमान ‘एअर इंडिया’ कंपनीचे असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र एअर इंडियाकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले. आपले एकही विमानत सध्या इटलीला जात नसल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.

(हेही वाचा मुंबईची लाईफलाईन पुन्हा बंद? काय म्हणाले राजेश टोपे)

चाचणीशिवाय प्रवासी विमानात बसलेच कसे?

विमानात बसताना प्रत्येक प्रवाशाची कोरोना चाचणी करण्यात येते. जर चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह नसेल, तरच प्रवाशाला विमाानाने प्रवास करता येतो. भारताप्रमाणे जगातील बहुतांश देशांमध्ये हाच नियम असताना कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एवढ्या रुग्णांना विमानात बसण्याची परवानगीच कशी देण्यात आली, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून भारताच्या चिंतेतही त्यामुळे भर पडली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.