Devendra Fadnvis : महाराष्ट्र-कर्नाटकात होणार पाणी करार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळी परिस्थितीत कर्नाटक सरकारने महाराष्ट्राकडे पाणी मागितल्यास ते दिले जाते. मात्र महाराष्ट्रातील दुष्काळी भागांसाठी जेव्हा पाणी हवे असते तेव्हा मात्र कर्नाटक कडून ते सहजरीत्या दिले जात नाही असा अनुभव आहे. यासाठीच कर्नाटक सरकार कडून कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी पाणी करार केला जाईल.

125
Devendra Fadnvis : महाराष्ट्र-कर्नाटकात होणार पाणी करार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnvis : महाराष्ट्र-कर्नाटकात होणार पाणी करार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळी परिस्थितीत कर्नाटक (karnatak) सरकारने महाराष्ट्राकडे (Maharshtra) पाणी मागितल्यास ते दिले जाते. मात्र महाराष्ट्रातील दुष्काळी भागांसाठी जेव्हा पाणी हवे असते तेव्हा मात्र कर्नाटक कडून ते सहजरीत्या दिले जात नाही असा अनुभव आहे. यासाठीच कर्नाटक सरकार कडून कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी पाणी करार केला जाईल. त्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. (Devendra Fadnvis)

फडणवीस म्हणाले, कोयना धरणात 86 टी.एम. सी पाणी उपलब्ध असून 14 टी.एम. सी पाण्याचा तुटवडा आहे. सांगली जिल्ह्याचे पाणी सोडतअसताना खंड पडला. मात्र सद्यस्थितीत कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. ताकारी योजनेचे पंप नियमित सुरू आहे. नदी कोरडी पडल्यानंतर जमिनीत पाणी मुरण्याची शक्यता लक्षात घेता पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Devendra Fadnvis)

(हेही वाचा : ISRO : चंद्राच्या पृष्ठभागावरील दगडांचे नमुने अभ्यासासाठी पृथ्वीवर आणण्याचा विचार – एस.सोमनाथ)

तसेच पाणी सोडताना खंड न पाडण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. आंतरराज्य पाणी वाटप असल्यामुळे त्याबाबत नियमात बसून कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांनी गुरुवारी कोयना धरणाच्या पाण्याचा मुद्दा सभागृहात लक्षवेधी सुचनेद्वारे उपस्थित केला. या लक्षवेधी सुचनेच्या चर्चेत पृथ्वीराज चव्हाण, संजय शिंदे, विक्रम सावंत,शिवेंद्रसिह भोसले, विश्वजीत कदम यांनी सहभाग घेतला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.