Rohit Pawar Vs Parth Pawar : २०२४ ला रोहित पवार विरुद्ध पार्थ पवार?; अजित पवार गटाकडून चाचपणी सुरू

रोहित यांना कर्जत जामखेड मतदारसंघात घेरण्याची तयारी अजित पवार गटाकडून सुरू करण्यात आली आहे

114
Rohit Pawar Vs Parth Pawar : २०२४ ला रोहित पवार विरुद्ध पार्थ पवार?; अजित पवार गटाकडून चाचपणी सुरू
Rohit Pawar Vs Parth Pawar : २०२४ ला रोहित पवार विरुद्ध पार्थ पवार?; अजित पवार गटाकडून चाचपणी सुरू

राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटाला शिंगावर घेऊ पाहणाऱ्या रोहित पवारांना धडा शिकवण्याची तयारी सध्या सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी पार्थ पवारांना मैदानात उतरवायचे आणि आगामी विधानसभेत रोहितला कर्जत जामखेडमध्ये घेरायचे, अशी रणनीती आखली जात आहे.

शरद पवारांसोबत सावलीसारखे फिरणारे रोहित पवार सध्या अजित पवार गटातील नेत्यांवर तुटून पडत आहे. ज्या रोहितला आमदार होण्यासाठी आम्ही जंगजंग पछाडले, तोच आज आमच्या विरोधात आवाज उठवतो आहे, ही बाब राष्ट्रवादीतील अनेक वरिष्ठ नेत्यांना पटलेली नाही. त्यामुळे रोहितचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे.

त्यानुसार, रोहित यांना कर्जत जामखेड मतदारसंघात घेरण्याची तयारी अजित पवार गटाकडून सुरू करण्यात आली आहे. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ यांना येथून मैदानात उतरवल्यास संभाव्य निकाल काय असेल, याची चाचपणी सध्या सुरू आहे. त्यासाठी भाजपाच्या राम शिंदे यांची मदत घेतली जात आहे. रोहित विरुद्ध पार्थ असा थेट संघर्ष झाल्यास पवारांसोबत सावलीसारखा फिरणारा रोहित स्वतःच्या मतदारसंघात अडकून पडेल, अशी रणनीती यामागे आहे.

(हेही वाचा – Womens Safety : रेल्वे प्रवास करणाऱ्या स्त्रिया आणि मुलींच्या सुरक्षेसाठी तेजस्विनी पथकाचा पुढाकार, जनजागृती मोहिमेचे आयोजन)

राम शिंदे दावा सोडणार का?

  • २०१९ मध्ये रोहित पवार यांनी भाजपाचे तत्कालीन मंत्री आणि देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू प्रा. राम शिंदे यांचा पराभव केला होता.
  • अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांनी रोहितला निवडून आणण्यासाठी त्यावेळी विशेष मेहनत घेतली होती. त्यानंतर राम शिंदे यांना विधानपरिषदेवर घेत त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न भाजपाकडून झाला असला, पराभवाचे शल्य त्यांना अद्याप बोचत आहे.
  • त्यामुळे रोहितला पराभूत करण्यासाठी त्यांचा चुलता आपल्या मुलाला मैदानात उतरवत असेल, तर काट्याने काटा काढल्यासारखे होईल. दुसरे म्हणजे कर्जत जामखेड विधानसभेच्या बदल्यात लोकसभेचे तिकीट मिळाल्यास केंद्रात काम करण्याची संधी मिळू शकेल.
  • हा विचार करून राम शिंदेंनी अजित पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. त्यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळण्याचे संकेत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.