WATER SHORTAGE : नागरिकांनो पाणी जपून वापरा

जुलै महिन्यात जोरदार बॅटिंग करणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात मात्र उसंत घेतल्याचं चित्र आहे.

98
WATER SHORTAGE : राज्यात पाणी टंचाईचे सावट
WATER SHORTAGE : राज्यात पाणी टंचाईचे सावट

राज्यात सर्वत्र पावसाने दडी मारली असल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहील. यासाठीच आतापासून पाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात करा. तसेच धरण क्षेत्रातील पाण्याचा करा. जनावरांच्या चाऱ्यासाठी जिल्हा नियोजन विकास निधीतून पैसे द्यावेत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

जुलै महिन्यात जोरदार बॅटिंग करणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात मात्र उसंत घेतल्याचं चित्र आहे. मात्र आजपासून राज्यातील काही भागात जोरदार पाऊस होईल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र फारसा पाऊस पडण्याची शक्यता नाही. मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यात सर्वसाधारणपणे २१.४ दिवसांमध्ये ५६०.८ मिलीमीटर सरासरी पाऊस पडतो. तर मागील वर्षी ऑगस्ट अखेरपर्यंत १२२ टक्के पाऊस पडला होता. मात्र यावर्षी फक्त ८९ टक्के पाऊस झाला आहे.

(हेही वाचा : ISRO : चंद्रयान-३ साठी इस्रोमध्ये काऊंटडाऊन सुरु)

कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय वातस्थितीमुळे राज्यात पावसाला चालना मिळेल, असे हवामान विभागानं म्हटलं आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या तीनही विभागांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचीच शक्यता आहे. ऑगस्टमध्ये सरासरीहून कमी पाऊस असल्याने सप्टेंबरमध्ये याची उणीव भरून काढण्याची शक्यता हवामान विभागानी वर्तवली आहे.अनेक ठिकाणी २१ दिवस पाऊस न झाल्याने पिके वाया जाण्याचा धोका निर्माण झाला असून तेथे पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही शिंदे यांनी दिले आहेत. राज्यात निर्माण झालेल्या टंचाईसदृश परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेत प्रशासनास सतर्कतेच्या सूचना दिल्या.

तीनशे पेक्षा अधिक गावांना टँकरने पाणी पुरवठा

ऐन पावसाळ्याच राज्यातील तीनशे पेक्षा अधिक गावांना टँकरने पाणी पुरवठा केले जात आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात पाऊस न पडल्यामुलं तिथे टॅकरनं पाणी पुरवठा केले जात आहे. पावसात अशी स्थित मग, पुढे काय? असा सवाल विचारला जातीय, सध्या राज्यातील ३२९ गावांना आणि १२०० पेक्षा अधिक वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केले जातेय.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.