प्रतिनिधी
विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर(Vidhan Parishad Election Result 2026)झाले असून, महायुतीने १७ पैकी १६ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले असले तरी, पडद्यामागची खरी गोष्ट मात्र धक्कादायक आकड्यांनी समोर आली आहे. अनेक मतदारसंघांमध्ये पक्षादेशाला हरताळ फासून मोठ्या प्रमाणावर ‘क्रॉस व्होटिंग’ झाल्याचे स्पष्ट झाले असून, या मतफुटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.(Vidhan Parishad Election Result 2026)
निवडणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, महाविकास आघाडीच्या पायाखालची जमीन कशी सरकली, हे दिसून येते. नागपूरमध्ये महाविकास आघाडीची ३९ मते फुटली आहेत, तर अमरावतीमध्ये तब्बल ९४ मतांची मोठी गळती झाली आहे. जळगावमध्ये आघाडीच्या ९० मतांचा रस्ता बदलला, तर धाराशिव-लातूर मतदारसंघात तर कहरच झाला; तिथे तब्बल १४६ मते फुटल्याने आघाडीचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे.(Vidhan Parishad Election Result 2026)
(हेही वाचा – Vaibhav Sooryavanshi : ‘बेबी मॉन्स्टर’ वैभव सूर्यवंशी महत्त्वाच्या सामन्यांत चमकणारा स्टार )
केवळ महाविकास आघाडीच नाही, तर महायुतीलाही मतफुटीचा फटका बसला आहे. सांगली-सातारा मतदारसंघात महायुतीची १०० मते फुटीर झाली आहेत, तर भंडारा-गोंदियामध्ये ३५ मतांचा फटका बसला आहे. या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या नाशिक मतदारसंघातील निकालाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या पारड्यात पडलेली ३५७ मते ही महायुतीच्या अंतर्गत नाराजीचा आणि क्रॉस व्होटिंगचा परिपाक असल्याचे स्पष्ट होत आहे.(Vidhan Parishad Election Result 2026)
हे आकडे केवळ निवडणुकीतील पराभवाचे नसून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निष्ठांवरील संकटाचे द्योतक आहेत. पक्षशिस्त आणि अंतर्गत नाराजीचा हा स्फोट आगामी काळातील निवडणुकीच्या समीकरणांवर कसा परिणाम करेल, यावरून आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. मतांची ही ‘खरेदी-विक्री’ झाली की पक्षांतर्गत बंडखोरी, यावर आता राजकीय गोटात खलबते सुरू झाली आहेत.(Vidhan Parishad Election Result 2026)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

