अयोध्या लढ्याचा इतिहास सांगणारा व्हिडीओ तासाभरात YouTubeने हटवला

88

दीपावलीच्या निमित्ताने सगळी अयोध्या नगरी २२ लाख दिव्यांनी उजळली. कारण अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत श्रीराम मंदिर उभे राहत आहे, आज हे मंदिर पूर्णत्वाच्या दिशेने आहे. यानिमित्ताने अवघ्या जगाचे लक्ष या मंदिराकडे लागलेले आहे. हे मंदिर आज उभे राहत आहे, परंतु त्याच्या उभारणीच्या आधी दोन दशकांचा संघर्षमय इतिहास आहे. हा इतिहास prachyam या व्हिडिओ चॅनलने ३ मिनिट २२ सेकंदाच्या व्हिडिओमधून सचित्र दाखवला, मात्र हा व्हिडीओ YouTube ने अवघ्या तासाभरात हटवला.

काय आहे व्हिडिओमध्ये? 

सगळ्यात काय महत्वाचे असते, निर्धारित ठिकाणी पोहचणे कि त्या ठिकाणी पोहचण्यासाठीचा प्रवास महत्वाचा असतो? अशा प्रश्नाने हा व्हिडीओ सुरु होतो. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्यातील सुरु असलेली चर्चा दिसते, पुढे लालकृष्ण आडवाणी यांनी राम मंदिरासाठी काढलेली रथयात्रा, त्यामध्ये जमलेला कोट्यवधींचा हिंदू समाज, संतांचे संघटन, पुढे बाबरी मशीद पतन, त्यावेळी मुलायम सिंग यांनी कारसेवकांवर केलेला अमानुष गोळीबार, पुढे गोध्रा हत्याकांड, राम मंदिर उभारण्यासाठी शिळा जमवण्याचे अभियान, देशात वाढलेली धार्मिकता, परदेशी नेते हिंदू संस्कृतीचा करत असलेला सन्मान आणि शेवटी यंदाच्या दीपावलीत श्रीराम मंदिर परिसरात २२ लाख दिवे लावल्याचे दृश्य दाखवण्यात आले आणि शेवटी शुभ दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हा व्हिडीओ YouTube वर अपलोड करताच अवघ्या तासाभरात हा व्हिडीओ काढून टाकण्यात आला.

(हेही वाचा Chhatrapati Sambhaji nagar : फटाक्यांमुळे १० ठिकाणी आगीच्या घटना, सुदैवाने कोणतीही) जीवितहानी नाही

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.