Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे सभागृहात नाही बाहेर बोलतात; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

विरोधी पक्षाने यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या चर्चेवर एकही प्रस्ताव दिला नाही. विरोधकांना विदर्भाचा विसर पडला आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

154
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे सभागृहात नाही बाहेर बोलतात; देवेंद्र फडणवीस यांचा टोला
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे सभागृहात नाही बाहेर बोलतात; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सभागृहात बोलत नाहीत, मात्र ते सभागृहाच्या बाहेर बोलतात. विरोधकांना विदर्भाचा विसर पडला आहे, हे अत्यंत खेदजनक आहे. आम्हाला आमच्या अध्यक्षांचे ऐकावे लागते, तसे तुम्हीही ऐकले पाहिजे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

(हेही वाचा – Ajay Piramal : पारंपरिक उद्योगाचा परिश्रमपूर्वक विस्तार करणारे पिरामल ग्रूपचे अध्यक्ष अजय पिरामल)

विरोधी पक्षाने यंदाच्या हिवाळी अधिवेशनात (maharashtra winter assembly) विदर्भाच्या चर्चेवर एकही प्रस्ताव दिला नाही. राज्याच्या हिवाळी अधिवेशाचा आजचा शेवटचा असून नागपुरात (Nagpur) हे अधिवेशन चालू आहे. अंतिम आठवड्यात विदर्भाच्या विकासावर प्रस्ताव दिला जातो. विरोधी पक्षनेते आणि नाना पटोले (Nana Patole) यांनी तरी प्रस्ताव मांडला पाहिजे होता. विरोधकांना विदर्भाचा (Vidarbha) विसर पडला, हे खेदजनक आहे. आम्हाला आमच्या अध्यक्षांचे ऐकावे लागते, तसेच तुम्हीही ऐकले पाहिजे. हा प्रस्ताव विरोधी पक्षनेते (Leader of the Opposition) यांनी मांडला पाहिजे होता. मात्र त्यावरही अन्याय करण्यात आला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न

अधिवेशनात सायबर गुन्ह्यांमध्ये 48.3 टक्के वाढ झाल्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे. नागपूरमध्ये (Nagpur) दंगलीसंदर्भात 2020 मध्ये 9 हजार गुन्हे दाखल झाले. आता 8 हजार गुन्हे आहेत, याचा अर्थ या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांचे नागपूरप्रेम वाढत गेले. त्यामुळे नागपूरला बदनाम करण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. 3 हजार 155 इतक्या संख्येने नागपुरातील गुन्हे कमी झाले. आता नागपूर (Nagpur) याबाबतीत 23 व्या स्थानावर आहे. जाणीवपूर्वक नागपूरला बदनाम केलं जात आहे, असे निवेदन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे.

(हेही वाचा – Royal Enfield Hunter 450 : रॉयल एनफिल्डच्या लोकप्रिय हंटर बाईकची नवीन आवृत्ती बाजारात येण्याच्या तयारीत)

खुनाच्या गुन्ह्यात महाराष्ट्र 20 व्या स्थानी

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, अपहरण आणि हरवलेल्या मुली यांच्या संदर्भात वारंवार चर्चा सुरु आहे. पण यामध्ये परत येण्याचीही संख्या जास्त आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे प्रमाण कमी आहे. खुनाच्या गुन्ह्यात महाराष्ट्र 20 व्या स्थानी आहे. बलात्काराच्या विरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. मात्र जे चित्र रंगवले जाते, तसे नाही. महाराष्ट्र राज्य हे सुरक्षित राज्य आहे. (Uddhav Thackeray)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.