Ajay Piramal : पारंपरिक उद्योगाचा परिश्रमपूर्वक विस्तार करणारे पिरामल ग्रूपचे अध्यक्ष अजय पिरामल

155
Ajay Piramal : पारंपरिक उद्योगाचा परिश्रमपूर्वक विस्तार करणारे पिरामल ग्रूपचे अध्यक्ष अजय पिरामल
Ajay Piramal : पारंपरिक उद्योगाचा परिश्रमपूर्वक विस्तार करणारे पिरामल ग्रूपचे अध्यक्ष अजय पिरामल

अजय गोपीकिसन पिरामल (Ajay Piramal) हे एक भारतीय उद्योगपती आहेत आणि पिरामल समूहाचे अध्यक्ष आहेत. पिरामल ग्रूप फार्मास्युटिकल (Piramal Group Pharmaceutical), वित्तीय सेवा, रिअल इस्टेट, हेल्थकेअर ॲनालिटिक्स (Healthcare Analytics) आणि ग्लास पॅकेजिंगमध्ये गुंतलेला आहे. सप्टेंबर २०२२ पर्यंत त्यांची एकूण संपत्ती ३ यूएस अब्ज $ इतकी होती.

(हेही वाचा – Sushma Andhare : नीलम गोऱ्हे यांचा सुषमा अंधारे यांना इशारा; ८ दिवसांत दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा…)

कौटुंबिक व पारंपरिक कापड व्यवसायातून सुरुवात

अजय पिरामल (Ajay Piramal) यांचा जन्म ३ ऑगस्ट १९५५ रोजी राजस्थानमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोपीकिसन पिरामल आणि आईचे नाव ललिता पिरामल. १९७७ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी ते त्यांच्या कौटुंबिक व पारंपरिक कापड व्यवसायात उतरले. या व्यवसायाची स्थापना त्यांचे आजोबा चत्रभुज पिरामल यांनी १९३४ मध्ये केली होती.

पिरामल यांनी जय हिंद कॉलेज आणि बसंतसिंग इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबई विद्यापीठ येथून विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली आहे आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई विद्यापिठातून व्यवस्थापन अभ्यासात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि १९९२ मध्ये हाॅर्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये (Harvard Business School) सिक्स-वीक ऍडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राममध्ये पदवी प्राप्त केली.

(हेही वाचा – Eknath Shinde : ‘यूबीटी’ च्या काळात ‘डीबीटी’ पोर्टल बंद होते; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका)

भारतातील पहिल्या मोठ्या शॉपिंग मॉलची उभारणी

१९७९ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि पाच वर्षांनंतर त्यांचा मोठा भाऊ कॅन्सरमुळे वारला. आता मात्र व्यवसाय आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यांना भारतातील ऍमिटी युनिव्हर्सिटीकडून (Amity University) मानद डॉक्टरेट आणि इंदूर आयआयटीकडून मानद डॉक्टर ऑफ सायन्स (Doctor of Science) हा बहुमान प्राप्त झाला आहे.

१९८८ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियन बहुराष्ट्रीय कंपनी निकोलस लॅबोरेटरीज (Nicholas Laboratories) विकत घेतली आणि निकोलस पिरामल (Nicholas Piramal) असे नामकरण केले. आता ही कंपनी भारतातील फार्मा कंपन्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. क्रॉसवर्ड (Crossroads Mall) नावाचा भारतातील पहिला मोठा शॉपिंग मॉल पिरामल कंपनीने विकसित केला आहे. पिरामल एंटरप्रायझेस लिमिटेडद्वारे त्यांनी व्होडाफोन इंडियामध्ये दोन टप्प्यांत ११% खरेदी करून गुंतवणूक केली. त्यानंतर त्यांनी आपला हिस्सा विकला देखील.

(हेही वाचा – SpiceJet to Bid For GoFirst : स्पाईसजेट कंपनी गोफर्स्ट खरेदी करण्यासाठी उत्सुक)

अजय पिरामल (Ajay Piramal) हे भारतातील यशस्वी व प्रख्यात उद्योजकांपैकी एक आहेत. त्याचबरोबर पिरामल फाउंडेशनच्या (Piramal Foundation) माध्यमातून त्यांनी समाजसेवा देखील केली आहे. ही संस्था भारताच्या २१ राज्यांमध्ये कार्यरत असून सरकारच्या हातात हात घालून काम करत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.