Royal Enfield Hunter 450 : रॉयल एनफिल्डच्या लोकप्रिय हंटर बाईकची नवीन आवृत्ती बाजारात येण्याच्या तयारीत

प्रिमिअम बाईकच्या श्रेणीत किंमत आणि कामगिरी या दोन्हीतही ही बाईक किफायतशीर ठरली होती. त्यामुळे हंटर ४५० बद्दल आतापासूनच उत्सुकता आहे

462
Royal Enfield Hunter 450 : रॉयल एनफिल्डच्या लोकप्रिय हंटर बाईकची नवीन आवृत्ती बाजारात येण्याच्या तयारीत
Royal Enfield Hunter 450 : रॉयल एनफिल्डच्या लोकप्रिय हंटर बाईकची नवीन आवृत्ती बाजारात येण्याच्या तयारीत
  • ऋजुता लुकतुके

रॉयल एनफिल्ड कंपनी भारतीय बाजारपेठेत सध्या जोरात आहे. कंपनीची नवीन हंटर ३५० बाईकही लोकांना पसंत पडली आहे. त्यामुळे आता कंपनीसाठी पुढे काय असं लोकांना वाटत असतानाच कंपनीने हंटर ४५० ची तयारी चालवली आहे. प्रिमिअम बाईकच्या श्रेणीत किंमत आणि कामगिरी या दोन्हीतही ही बाईक किफायतशीर ठरली होती. त्यामुळे हंटर ४५० बद्दल आतापासूनच उत्सुकता आहे.(Royal Enfield Hunter 450)

रॉयल एनफिल्ड ४५० ट्विन्स या गाडीचं डिझाईन हे रेट्रो आहे. पण, सुविधा अत्याधुनिक आहेत. एनफिल्ड हंटरच्या नवीन मॉडेलबरोबरच कंपनी नवीन इंजिन तयार करण्यावर काम करत आहे. नवीन इंजिन ४५० सीसी क्षमतेचं लिक्विड कूल, सिंगल सिलिंडर इंजिन असेल. आणि यातून ४० बीएचपी शक्ती तर ४० एनएम टॉर्क इतकी शक्ती निर्माण होईल.(Royal Enfield Hunter 450)

अलीकडेच या कंपनीचा टेस्ट ड्राईव्हिंगचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.(Royal Enfield Hunter 450)

(हेही वाचा – Crime : पूर्व उपनगर हादरले, ६४ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करून विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर फेकले )

चालकांच्या सुरक्षिततेसाठी या बाईकमध्ये अतिरिक्त फिचर्स असतील असं बोललं जात आहे. ड्युआल चॅनल एबीएस, तसंच स्विचेबल एबीएस हे यातलेच काही फिचर्स आहेत. रॉयल एनफिल्ड कंपनी दर तीन महिन्यांनी एक नवीन बाईक भारतीय बाजारपेठेत लाँच करणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

 बाईकचं नाव हंटर ट्विन्स का आहे?

अलीकडेच हंटर ३५० लाँच झाल्यानंतर आधी कंपनी या बाईकची क्सासिक बाईक लाँच करेल असा अंदाज आहे.(Royal Enfield Hunter 450)आणि त्यानंतर लगेचच कंपनी हंटर ४५० लाँच करण्याची तयारी करेल असा अंदाज आहे. २०२४ च्या पहिल्या तिमाहीत ही बाईक बाजारात येईल असा अंदाज आहे. या ट्विन बाईक आहेत. म्हणजे गाडीत दोन प्रकारचे सिलिंडर आहेत. अशा या ट्विन बाईकची किंमत २.७० लाख  रुपये इतकी असेल.(Royal Enfield Hunter 450)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.