Shiv Sena UBT : अनिल परब यांच्याकडील विभागप्रमुख पदासाठी ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार ठरणार वारसदार

आमदार अनिल परब यांची शिवसेना उबाठा नेतेपदी नियुक्ती केल्याने त्यांना आता वांद्रे ते अंधेरी परिसराच्या विभाग प्रमुख पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.

176
Shiv Sena UBT : अनिल परब यांच्याकडील विभागप्रमुख पदासाठी ठाकरेंचा 'हा' शिलेदार ठरणार वारसदार
Shiv Sena UBT : अनिल परब यांच्याकडील विभागप्रमुख पदासाठी ठाकरेंचा 'हा' शिलेदार ठरणार वारसदार

आमदार अनिल परब यांची शिवसेना उबाठा नेतेपदी नियुक्ती केल्याने त्यांना आता वांद्रे ते अंधेरी परिसराच्या विभाग प्रमुख पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. त्यामुळे या भागातील विभागप्रमुख पदासाठी मागील दहा ते पंधरा वर्षांपासून आग्रही असणाऱ्या संजय सावंत यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. संजय सावंत हे शिवसेना उबाठा गटाचे सर्वांत निष्ठावंत शिवसैनिक असून भारतीय कामगार सेनेत तत्कालिन किरण पावसकर यांच्यासोबत काम करत कामगार संघटना मजबूत केली होती. परंतु त्यांचे पुनर्वसन शिवसेने श्री सिध्दीविनायक न्यास समितीवर करत त्यांना शांत केले असले तरी अनिल परब हे शिवसेना नेते झाल्याने सावंत यांच्या रुपात पक्षाला आक्रमक नेतृत्व या विभागाला मिळेल, असे बोलले जात आहे. (Shiv Sena UBT)

शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते व विभागप्रमुख ऍड अनिल परब यांना पक्षाने बढती देत त्यांना पक्षाच्या कार्यकारिणीत स्थान देत नेतेपदी त्यांची नियुक्ती केली. शिवसेना पक्षाच्या कार्यकारिणीत परब यांना स्थान मिळाल्याने विभागप्रमुख पदावरून त्यांना बाजुला व्हावे लागणार आहे. त्यामुळे अनिल परब यांचे वारसदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे परब यांचे वारसदार म्हणून विभागप्रमुख पदावर शैलेश फणसे, सदा परब, राजू पेडणेकर यांची नावे चर्चेत आहेत. परंतु या नावाबरोबरच आणखी एक नावे चर्चेत आता आले असून ते नाव आहे श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे विश्वस्त संजय सावंत. संजय सावंत हे भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी होते आणि त्यांच्याकडे बॉम्बे हॉस्पिटल युनिटची मुख्य जबाबदारी होती. परंतु किरण पावसकर शिवसेनेत असताना संजय सावंत हे सर्वांत आक्रमक असे शिलेदार म्हणून ओळखले जायचे. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – Lalit Patil Case : ललित पाटील प्रकरणाचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद)

शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात संजय सावंत हे अग्रेसर राहून आंदोलकांमध्ये एकप्रकारे जोश निर्माण करायचे. परंतु पावसकर पक्ष सोडून गेल्यानंतर भारतीय कामगार सेनेत काम करताना संजय सावंत यांना पक्षाने श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासावर नियुक्त केले. संजय सावंत हे कायमच शिवसेना उबाठा गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांची सावली बनून राहिलेले आहेत. तसेच राऊत जेलमध्ये गेल्यानंतर पक्षात नव्याने प्रवेश करणाऱ्या सुषमा अंधारे यांचीही ते सावली बनून राहिले होते आणि आजही या दोन्ही नेत्यांसोबत ते कायम दिसत असतात. (Shiv Sena UBT)

वांद्रे ते अंधेरी वर्सोवा भागाच्या विभागप्रमुख पदासाठी संजय सावंत हे पूर्वी आग्रही होते. परंतु अनिल परब यांनी मातोश्रीला पटवून विभागप्रमुख आपल्याकडे घेत सावंत यांची स्वप्ने भंग केली होती. परंतु आता अनिल परब हे पक्षाचे नेते झाल्याने संजय सावंत यांना विभागप्रमुख बनण्याची संधी चालून आल्याचे बोलले जात आहे. स्वत: उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी वहिनी तसेच संजय राऊत यांच्यासह सुषमा अंधारे या सर्वांशी असलेले चांगले संबंध आणि त्यांच्यातील आक्रमक नेतृत्व यामुळे सावंत यांच्याकडे पक्ष विभागप्रमुख पद सोपवते की पुन्हा एकदा अनिल परब हे पद आपल्याकडे ठेवून घेत सावंत यांचा स्वप्न भंग करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.