प्रतिनिधी
महाराष्ट्रातील ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत राज्य सरकारने अॅनॅलॉग चीज अर्थात कृत्रिम (आर्टिफिशियल) पनीरच्या वापरावर एक वर्षासाठी बंदी(Paneer Ban)घालण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी यासंदर्भातील राजपत्र जारी केले असून, या निर्णयानंतर कृत्रिम पनीरची विक्री व वापर करणाऱ्यांविरोधात थेट कारवाई करण्यात येणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅटरिंग सेवांमध्ये नैसर्गिक पनीरऐवजी अॅनॅलॉग चीजचा वापर होत असल्याबाबत सातत्याने तक्रारी समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने यापूर्वी अशा पदार्थांच्या मेनू कार्डमध्ये “अॅनॅलॉग चीज” किंवा “आर्टिफिशियल पनीर” असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक केले होते.(Paneer Ban)
(हेही वाचा – Mumbai Police Salary Scam : मुंबई पोलीस दलात ६.४१ कोटींचा ‘कागदी’ वेतन घोटाळा; १० बनावट कर्मचाऱ्यांच्या नावावर लाटले वेतन! )
मात्र, या आदेशाचे अनेक ठिकाणी पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत थेट बंदीचा निर्णय घेतला आहे. यापुढे कृत्रिम पनीर विक्री, साठवण किंवा वापर आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.(Paneer Ban)
या विषयाला विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी जोरदारपणे उपस्थित केले होते. राज्यातील अनेक खाद्यव्यवसायांमध्ये ग्राहकांना माहिती न देता आर्टिफिशियल पनीर वापरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच, राज्यात विकल्या जाणाऱ्या पनीर पदार्थांपैकी मोठा हिस्सा कृत्रिम पनीरपासून तयार होत असल्याचाही मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला होता.(Paneer Ban)
या निर्णयामुळे ग्राहकांना अधिक पारदर्शक माहिती मिळण्यास मदत होणार असून, खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावरही अधिक जबाबदारी येणार आहे.(Paneer Ban)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

