“जनतेची कामं करा, पक्षवाढीवर लक्ष द्या…”; Eknath Shinde यांनी मंत्र्यांची केली कानउघाडणी!

"जनतेची कामं करा, पक्षवाढीवर लक्ष द्या..."; Eknath Shinde यांनी मंत्र्यांची केली कानउघाडणी!

82
शिवसेनेच्या मंत्र्यांची आता थेट परीक्षा? कॅबिनेटआधी Eknath Shinde राबवणार मंत्र्यांचा ‘रिपोर्ट कार्ड’ फॉर्म्युला
शिवसेनेच्या मंत्र्यांची आता थेट परीक्षा? कॅबिनेटआधी Eknath Shinde राबवणार मंत्र्यांचा ‘रिपोर्ट कार्ड’ फॉर्म्युला
प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde)यांनी आपल्या पक्षातील मंत्र्यांबाबत कठोर भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यापासून ते मतदारसंघातील जनतेची कामे प्रभावीपणे करण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.(Eknath Shinde)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्री-कॅबिनेट बैठकीत शिंदे यांनी काही मंत्र्यांच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. जनतेशी संपर्क वाढवा, मतदारसंघात पक्ष संघटना बळकट करा आणि विकासकामांना गती द्या, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. कामगिरीत सुधारणा न झाल्यास मंत्रिमंडळात बदल अटळ असल्याचा इशाराही त्यांनी दिल्याची चर्चा आहे.(Eknath Shinde)

विशेष म्हणजे, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील पक्षवाढ अपेक्षित गतीने होत नसल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केल्याचे समजते. काही मंत्र्यांकडून अपेक्षित कामगिरी होत नसल्याची खंत त्यांनी बैठकीत बोलून दाखवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.(Eknath Shinde)

(हेही वाचा – आता UPI व्यवहारांसाठी मोजावे लागणार पैसे? संसदेत विधेयक सादर; जाणून घ्या तुमच्या खिशावर काय परिणाम होणार? )

दरम्यान, राज्यातील राजकीय समीकरणांनाही वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेत शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीनंतर आगामी काळात केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील काही खासदारांना संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेली भेटही या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.(Eknath Shinde)

याचबरोबर काही आमदारही शिंदे यांच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा असून, आगामी दिवसांत आणखी काही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Eknath Shinde)

दरम्यान, संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपके यांची घेतलेली भेटही चर्चेचा विषय ठरली असून, त्यातून भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्यातील संबंधांबाबत विविध राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.(Eknath Shinde)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.