राज्यातील पोलीस दलातील बदल्या आल्या अडचणीत; Election Commission ने मागवला अहवाल

125

मागील महिनाभरात राज्यातील पोलीस दलाच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या. बहुतांश जिल्ह्यांत या बदल्या केल्या, त्यामध्ये आयपीएस अधिकाऱ्यांपासून ते पोलीस निरीक्षकांपर्यंत या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र या बदल्या आता अडचणीत सापडल्या आहेत.

काय आहे कारण? 

केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Election Commission) निर्देश धाब्यावर बसवून या बदल्या करण्यात आल्या आहेत, असे सांगत केवळ निवडणूक आयोगानेच नव्हे तर महाराष्ट्र प्रशासनिक लवादानेही याची दखल घेतली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) तर पोलीस महासंचालकांना या बदल्यांच्या संदर्भात अहवाल मागवला आहे. निवडणुकीशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची तीन वर्षे वा त्यापेक्षा अधिकचा कालावधी एका ठिकाणी झालेला असेल, त्यांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली करावी, असे आयोगाचे निर्देश आहेत. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, सोलापूरमध्ये  त्याच जिल्ह्यात बदल्या केल्या. काही अधिकाऱ्यांना ‘साईड पोस्टिंग’ दिल्या, तर ज्यांच्या जागी त्यांना ‘साईड पोस्टिंग’ दिले त्या अधिकाऱ्यांना तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नव्हता.

(हेही वाचा J.J. Bridge Beatification : जे.जे उड्डाण पुलाखाली भाजप आणि काँग्रेस आमदार एकत्र)

आमचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही, निवडणुकीशी संबंधित पदांवर आम्ही कार्यरत नाही मग आमची बदली का म्हणून? हा आमच्यावर अन्याय आहे,’ असे म्हणत या अधिकाऱ्यांनी ‘मॅट’कडे धाव घेतली. त्यावर, याबाबत पोलिस महासंचालक व ‘मॅट’कडे ज्या बदल्यांबाबत तक्रारी आलेल्या आहेत, तेथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक निवडणूक आयोगाने (Election Commission) घ्यावी, असे निर्देश ‘मॅट’ने दिले. त्यानुसार मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी बैठक घेतली. पोलिस दलात निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या बदल्या निवडणूक आयोगाचे निर्देश डावलून कुठे-कुठे करण्यात आल्या, याची छाननी केली जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.