संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक

176

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस, प्रवक्ते संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात भांडुपमधून तिसऱ्या विकास चावरिया या आरोपीला अटक करण्यात आली आहे. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली असून त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग वॉक दरम्यान देशपांडे यांच्यावर बॅट आणि स्टम्पने हल्ला करण्यात आला होता. गुन्हे शाखेने शिवाजी पार्कसह मुंबईतील सुमारे २५० हून अधिक सीसीटीव्हीचे फुटेज तपासत अन्य तांत्रिक पुरावे आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपी हे भांडुपमधील रहिवासी असल्याची माहिती मिळविली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल सेनेचा उपाध्यक्ष अशोक खरात (५६) आणि त्याचा सहकारी किशन सोलंकी (३५) या दोघांना अटक करण्यात आली.

दरम्यान, आपले नाव मोठे व्हावे, सर्वांना समजावे, या हेतूने हा हल्ला केल्याचे अशोक खरातने चौकशीत सांगितल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र मागील तीन दशकांहून अधिक काळ गुन्हेगारी जगतात सक्रिय असलेल्या अशोकने दिलेला जबाब न पटणारा होता. कारण हल्ला प्रकरणातील अशोक खरात हा मुख्य आरोपी असून त्याच्यावर याआधी मोक्का लावण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर डोंबिवलीत हत्या आणि ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर हल्ला प्रकरणाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे.

(हेही वाचा – संजय राऊतांवरचा हक्कभंग प्रस्ताव राज्यसभेकडे पाठवणार? हालचालींना वेग)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.