MLA Disqualification Case : ठाकरे गटाच्या पदरी पुन्हा निराशा, सुनावणी अनिश्चित काळासाठी लांबणीवर

ही सुनावणी येत्या ३१ ऑक्टोबर रोजी होणार होती. पण आता ती दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे.

32
MLA Disqualification Case : ठाकरे गटाच्या पदरी पुन्हा निराशा, सुनावणी अनिश्चित काळासाठी लांबणीवर
MLA Disqualification Case : ठाकरे गटाच्या पदरी पुन्हा निराशा, सुनावणी अनिश्चित काळासाठी लांबणीवर

निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी येत्या ३१ ऑक्टोबर रोजी होणार होती. पण आता ती दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. (MLA Disqualification Case)

दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाबाबतच्या दिलेल्या निर्णयाविरोधातील दाखल याचिकेवर गेल्यावेळी होणारी सुनावणी पुढे ढकलली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात ३१ ऑक्टोबरला सुनावणी अपेक्षित होती, पण ही सुनावणीही पुढे ढकलल्याने आता पुढची सुनावणी कधी होते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. (MLA Disqualification Case)

(हेही वाचा – Israel Hamas War : ही तिसऱ्या विश्वयुद्धाची सुरुवात; इस्रायली इतिहासकारांनी व्यक्त केली भीती)

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाबाबतच्या दिलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर ३१ ऑक्टोबरला सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. शिवसेना पक्षाबाबत आता सर्वोच्च न्यायालयात दिवाळीनंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे. (MLA Disqualification Case)

शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदेंनी खरी शिवसेना आपलीच आहे, असा दावा केला होता. त्यानंतर हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात गेलं होतं. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंचा (ठाकरे आणि शिंदे) युक्तिवाद ऐकल्यानंतर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिवसेनेला देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. (MLA Disqualification Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.