Bhagwan Parshuram कोण होते, त्यांचे खरे नाव काय होते?

140
भगवान परशुराम (Bhagwan Parshuram) हे जमदग्नी ऋषी आणि रेणुका देवी यांचे पुत्र आहेत. भगवान विष्णूच्या अवतारांपैकी सहावा अवतार म्हणजे परशुराम होय. त्यांना भगवान विष्णूचा आवेशावतारही म्हटलं जातं. महाभारत आणि विष्णुपुराणानुसार परशुरामांचे मूळ नाव राम होते. पण जेव्हा महादेवांनी त्यांना परशु नावाचे शस्त्र दिले, तेव्हा त्यांचे नाव परशुराम झाले. त्यांचे आजोबा भृगुऋषी यांनी त्यांचं नाव राम असं ठेवलं होतं. ते जमदग्नी ऋषींचे पुत्र असल्यामुळे त्यांना जमदग्नी-राम म्हणतात. त्यांनी महर्षि विश्वामित्र आणि महर्षि ऋचिक यांच्या आश्रमात शिक्षण घेतले.
त्यासोबतच परशुरामांनी (Bhagwan Parshuram) महर्षी ऋचिक यांच्याकडून शारंग नावाचे दिव्य वैष्णव धनुष्य आणि ब्रह्मर्षी कश्यप यांच्याकडून अविनाशी वैष्णव मंत्रही प्राप्त करून घेतला. त्यानंतर कैलास गिरीशृंगावर असलेल्या भगवान महादेवांच्या आश्रमात ज्ञानाची प्राप्ती करून त्यांनी विद्युदाभी परशु नावाचे विशेष दिव्य अस्त्र प्राप्त केले. त्यांनी महादेवाकडून श्रीकृष्णाचे त्रैलोक्य विजय कवच, स्तवराज स्तोत्र आणि मंत्र कल्पतरू देखील प्राप्त केले. चक्रतीर्थात त्यांनी केलेल्या कठीण तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्यांना त्रेतायुगामध्ये रामाचा अवतार घेतल्यानंतर शेवटच्या कल्पापर्यंत पृथ्वीवर तपश्चर्या करून राहण्याचे वरदान दिले. भगवान परशुराम हे सप्तचिरंजीवींपैकी एक आहेत.
भगवान परशुराम (Bhagwan Parshuram) हे शस्त्रास्त्र चालविण्यात निपुण होते.  त्यांनी भीष्म, द्रोण आणि कर्ण यांना शस्त्रास्त्रांचे ज्ञान दिले होते. त्यांनी अकरा श्लोकांमध्ये “शिवपंचतवरिष्णम स्तोत्र” देखील लिहिले. अत्रि ऋषींची पत्नी अनसूया, अगस्त्य ऋषींची पत्नी लोपामुद्रा आणि त्यांची आवडती शिष्या अकृतवन यांच्या मदतीने त्यांनी महिला जागृती मोहीमही चालवली. असेही म्हटले आहे की कलियुगात जेव्हा कल्की अवतार घेईल तेव्हा भगवान परशुराम हे गुरुपद धारण करून कल्कीला शस्त्रास्त्रांचे ज्ञान देतील. आपली कोकण भूमी ही अरशुराम भूमी म्हणून ओळखली जाते. अशा या महाज्ञानी आणि महापराक्रमी परशुरामांची आज जयंती…
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.