राज्य सरकार Ayodhya आणि Shrinagar ला महाराष्ट्र भवन उभारणार

राज्य सरकारकडून पर्यटनाला चालना

122
राज्य सरकार Ayodhya आणि Shrinagar ला महाराष्ट्र भवन उभारणार
राज्य सरकार Ayodhya आणि Shrinagar ला महाराष्ट्र भवन उभारणार

भाजपा-शिवसेना (एकनाथ शिंदे)-राहत्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुती सरकारने राज्यातील पर्यटकांना आणि भाविकांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून किफायतशीर दरामध्ये उत्तम व सुरक्षित सुविधा पुरविण्यासाठी श्रीनगर, जम्मू-काश्मीर आणि श्रीराम जन्मभूमी, अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत जाहीर केले.

७७ कोटी तरतूद

पवार यांनी २०२४-२५ या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. यावेळी बोलताना पवार म्हणाले, श्रीनगर आणि अयोध्या (Ayodhya) या दोन्ही ठिकाणी तेथील राज्य शासनांनी मोक्याच्या जागा उपलब्ध करून दिल्या असून या जागांसाठी ७७ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.

पर्यटन धोरण आखणार

एकूणच राज्य सरकारने पर्यटनावर भर दिला असून पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरणही आखण्यात येईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. राज्यातील ५० नवीन पर्यटन स्थळांची निवड करून त्या ठिकाणी थीम पार्क, अॅडव्हेंचर स्पोर्टस्, शॉपिंग मॉल, वॉटर पार्क आणि निवास व्यवस्था करण्यात येत असल्याचे पवार यांनी जाहीर केले.

(हेही वाचा – Ind vs Eng 4th Test : यशस्वी जयस्वालने विराटच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी)

उच्च दर्जाच्या सुविधा

लोणार, जिल्हा बुलढाणा, अजिंठा-वेरुळ, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, कळसुबाई-भंडारदरा, जिल्हा अहमदनगर, त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक तसेच कोकणातील सागरी किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. लोणावळा, जिल्हा पुणे येथे ३३३ कोटी ५६ लाख रुपये अंदाजित किंमतीचा जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्प उभारण्यात येईल.

शिवकालीन ३२-गडकिल्ल्यांचे नूतनीकरण व संवर्धन

शिवसागर जलाशय, जिल्हा सातारा, गोसीखुर्द जलाशय, जिल्हा भंडारा तसेच वाघुर जलाशय, जिल्हा जळगाव येथे नाविन्यपूर्ण जल पर्यटन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. कोकण विभागातील पर्यटनास चालना देण्यासाठी शिवकालीन ३२-गडकिल्ल्यांचे नूतनीकरण व संवर्धन करण्यात येणार आहेत. तसेच मंत्रालय आणि परिसरातील शासकीय इमारतींचा अत्याधुनिक सुविधांसह पुनर्विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वास्तुरचनाकारांकडून प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. पर्यटन विभागास एकूण १ हजार ९७३ कोटी रुपये आर्थिक तरतूद प्रस्तावित केली असल्याचे पवार यांनी विधानसभेत सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.