Ind vs Eng 4th Test : यशस्वी जयस्वालने विराटच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी

देशांतर्गत मालिकेत सर्वात जास्त धावा करण्याच्या विराटच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. 

142
ICC Test Ranking : यशस्वी जयस्वाल आयसीसी क्रमवारीत पहिल्यांदाच पहिल्या दहांत
  • ऋजुता लुकतुके

भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने (yashasvi jaiswal) भारतातील मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या विराट कोहलीच्या (virat kohli) विक्रमाशी बरोबरी केली आहे. इंग्लंड विरुद्ध पहिल्या ४ कसोटींत यशस्वीने ६५५ धावा केल्या आहेत. तो आज ३७ धावा करून जो रुटच्या गोलंदाजीवर जिमी अँडरसनकडे झेल देऊन बाद झाला. एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मात्र लिटर मास्टर सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. १९७८-७९ च्या विंडिज दौऱ्यात गावसकर यांनी ७३२ धावा केल्या होत्या. (Ind vs Eng 4th Test)

या मालिकेत यशस्वी जयस्वाल (yashasvi jaiswal) भन्नाट फॉर्ममध्ये आहे. हंगामातील पहिल्याच कसोटीत त्याने ८० धावा करून सुरुवात केली होती. त्यानंतर विशाखापट्टणम कसोटीत त्याने पहिलं द्विशतक केलं. आणि राजकोटमध्ये दुसरं द्विशतक ठोकून भारताला मालिकेतही आघाडी मिळवून दिली. (Ind vs Eng 4th Test)

२०१६ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतच विराट कोहलीने (virat kohli) मालिकेत ६५५ धावा केल्या होत्या. विराटने या मालिकेत २ शतकं आणि २ अर्धशतकं केली होती. त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या होती २३५. ही मालिका भारतातच खेळवली गेली होती. (Ind vs Eng 4th Test)

(हेही वाचा – Marathi Rajbhasha Din निमित्त मनसेचा उपक्रम; पुस्तक प्रेमी व वाचकांसाठी पुस्तकांचा अमूल्य ठेवा)

इंग्लंज विरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज,

यशस्वी जयस्वाल – २०२४ – ६५५ धावा वि. इंग्लंड

विराट कोहली – २०१६ – ६५५ धावा वि. इंग्लंड

राहुल द्रविड – २००२ – ६०२ धावा वि. इंग्लंड

विराट कोहली – २०१८ – ५९६ वि. इंग्लंड

विजय मांजरेकर – १९६२ – ६८३ वि. इंग्लंड (Ind vs Eng 4th Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.