Retirement policy in BJP : पंतप्रधानांच्या घोषणेमुळे भाजपच्या वयस्कर खासदारांच्या आशा पल्लवित

निवृत्ती वयाची अट शिथिल करण्यात आल्याचे भाजपमध्ये वातावरण

98
Retirement policy in BJP : पंतप्रधानांच्या घोषणेमुळे भाजपच्या वयस्कर खासदारांच्या आशा पल्लवित
Retirement policy in BJP : पंतप्रधानांच्या घोषणेमुळे भाजपच्या वयस्कर खासदारांच्या आशा पल्लवित

वंदना बर्वे

‘पुढील पाच वर्षांत भारत जगातील तिसरी आर्थिक व्यवस्था झाल्याशिवाय राहणार नाही’, अशी घोषणा मोदी यांनी केली आहे. या एका घोषणेने वानप्रस्थ आश्रमाला जाण्याची तयारी करीत असलेल्या भाजपच्या वयस्कर खासदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये राजकारणातील निवृत्तीवय जाहीर केले होते. वयाची पंच्च्याहत्तरी गाठणा-यांनी सरकार आणि संघटनेतील पद सोडून मार्गदर्शक म्हणून काम करण्याचे आवाहन केले होते. यानंतर माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी यांच्यासह तब्बल 20 जणांनी मार्गदर्शक मंडळात प्रवेश केला होता. सध्या लोकसभेत भाजपचे 303 खासदार आहेत. यात वयाची 75 ओलांडलेली आहे किंवा 1-2 वर्षांत ओलांडणार आहेत, अशा जवळपास 25 खासदारांचा समावेश आहे. चित्रपट अभिनेत्री आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी, किरन खेर, रिता बहुगुणा जोशी, संतोष गंगवार हेही वयस्कर खासदार आहेत.

(हेही वाचा – Love Jihad In Nagar : शिकवणीच्या नावाखाली मुसलमान शिक्षिका देते लव्ह जिहाद आणि धर्मांतराचे धडे)

मार्गदर्शक मंडळाच्या पात्रतेनुसार आपल्याला आता राजकारणात सक्रीय राहता येणार नाही, अशी भीती त्यांना आतापर्यंत वाटत होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेने या सर्व खासदारांच्या मनात नवीन आशा निर्माण केली आहे.

भारत जगातील तिसरी आर्थिक महाशक्ती झाल्याशिवाय राहणार नाही, याचा एक अर्थ असाही होतो की, नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार आणि 2029 मधील निवडणुकीपर्यंत पंतप्रधान रहाणार. म्हणजे निवृत्ती वयाची अट शिथिल करण्यात आली आहे, असे वातावरण सध्या भाजपमध्ये आहे. 2029 मध्ये नरेंद्र मोदी 79 चे होतील. वयाची 75 री ओलांडल्यानंतरही पंतप्रधान राजकारणात सक्रीय राहत असतील, तर आपल्यालाही सक्रीय राहता येईल. यामुळे 2024 च्या निवडणुकीत पक्ष आपल्याला पुन्हा तिकीट देईल. आपण निवडणूक लढू आणि मार्गदर्शक मंडळात जावे लागणार नाही, असे या खासदारांचे म्हणणे आहे.

निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या खासदारांची यादी

वय 82 – जी.एस. बसवराज
वय 81 – बाचे गौडा
वय 76 – श्रीमती जसकौर मीना, सत्यदेव पचौरी, अक्शीबर लाल, श्रीनिवास प्रसाद, विवेक शेजवाळकर
वय 75 – हेमा मालिनी, संतोष गंगवार, पर्वतभाई पटेल आणि शारदा पटेल.
वय 74 – रिता बहुगुणा जोशी, के.सी. पटेल, राधामोहन सिंग, पशुपतीनाथ सिंग
वय 73 – पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्वीन ओझा, जगदंबिका पाल, इंद्रजीत सिंग, जादो चंद्रसेन, माला राजलक्ष्मी शाह, किरीट सोलंकी
वय 72 – एस. एस. अहलुवालिया, सुमेधानंद सरस्वती
वय 71 – किरण खेर

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.