Chhagan Bhujbal’s Controversial Statement : शाळांतील प्रतिमांविषयी छगन भुजबळ यांचे पुन्हा वादग्रस्त विधान !

97
Chhagan Bhujbal's Controversial Statement :शाळांतील प्रतिमांविषयी छगन भुजबळ यांचे पुन्हा वादग्रस्त विधान !
Chhagan Bhujbal's Controversial Statement :शाळांतील प्रतिमांविषयी छगन भुजबळ यांचे पुन्हा वादग्रस्त विधान !

ज्यांचे आपण फोटो लावतो, त्यांनी किती शाळा केल्या. त्यांनी सर्वांना का नाही शिकवले ? आपले देव ओळखायला शिका, असे वादग्रस्त विधान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा केले आहे. छगन भुजबळ यांनी या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शाळेत लावण्यात येणाऱ्या सरस्वतीदेवीच्या प्रतिमेवर पुन्हा प्रश्न उपस्थित केला आहे. नाशिक शहरातील मखमलाबाद परिसरातील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या शैक्षणिक संकुलात आयोजित समाजदिन सोहळ्याला छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली. यावेळी ते बोलत होते.

(हेही वाचा – Retirement policy in BJP : पंतप्रधानांच्या घोषणेमुळे भाजपच्या वयस्कर खासदारांच्या आशा पल्लवित)

 या वेळी छगन भुजबळ पुढे म्हणाले की, आम्ही कुठेही गेलो, तरी शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा सोडणार नाही. आपल्यासाठी महात्मा फुले, सावित्राबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, रावसाहेब थोरात यांनी शिक्षणाची दारे खुली केली. कोणाला सरस्वती, तर कोणाला शारद आवडते. आम्ही यांना पाहिलं नाही किंवा आम्हाला त्यांनी शिक्षण दिले नाही. या महापुरुषांनी आम्हाला शिक्षण दिले; म्हणून ते माझे देव आहेत, तेच तुमचेही देव असले पाहिजेत. मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत.

यापूर्वीही 2022 मध्ये ‘शाळेत महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत. त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात’, असे विधान भुजबळ यांनी केले होते. त्या वेळी अनेक सत्ताधाऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

सरस्वतीचा अवमान करणे बरोबर नाही ! – पालकमंत्री दादा भुसे

फुले-शाहू-आंबेडकर यांना पुजलेच पाहिजे. मात्र यात माता सरस्वतीचा अवमान करणे बरोबर नाही. भारत देश हा हिंदू देवताना मान्य करणारा असून कुणाच्या भावनांना ठेच लागेल असे बोलू नये, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी छगन भुजबळ यांच्या विधानावर दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.