काँग्रेससाठी अपक्ष बनले प्राधान्य, अजित पवार होणार मध्यस्थ?

81

राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी चढाओढ सुरु आहे. कारण काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि भाजपाला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी छोट्या पक्षांच्या आमदारांसह अपक्ष आमदारांनाही गळाला लावावे लागणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी आणि भाजपासाठी अपक्ष हे प्राधान्य बनले आहे. मात्र अपक्षांना राजी करण्यासाठी काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवारांना मध्यस्थी करण्यासाठी विनंती केली आहे, असे सूत्रांकडून समजते.

अपक्षांसोबत घेणार बैठक 

राज्यसभा निवडणुकीत हीच स्थिती शिवसेनेची होती, त्यावेळी शिवसेनेला अतिरिक्त मतांची आवश्यकता होती. मात्र अपक्षांनी दगाफटका केला आणि शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला, त्यावेळी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असूनही शिवसेनेला एकट्याला मतांची जमवाजमव करावी लागली, हे दुःख सहन न झाल्यामुळे अखेर शिवसेनेने राज्यसभेत तुमचे तुम्ही बघा असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आव्हान बनले आहे. त्याकरता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली, त्यानंतर अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी अपक्ष आमदारांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे आता विधान परिषद निवडणुकीत गेम चेंजरची भूमिका बजावणाऱ्या अपक्षांचे राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीतही महत्व वाढले आहे.

(हेही वाचा केतकी चितळेवर कारवाई, मग शेख हुसेन यांच्यावर का नाही? भाजपचा सवाल )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.