Shiv Sena UBT : उबाठा शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांवरील विभागप्रमुखांचा भार होणार हलका

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्यांना आता नेतेपदी बढती दिल्यामुळे आमदार सुनील प्रभू आणि आमदार अनिल परब यांना आता विभागप्रमुख पदाची खुर्ची सोडावी लागणार आहे.

134
Shiv Sena UBT : उबाठा शिवसेनेच्या 'या' नेत्यांवरील विभागप्रमुखांचा भार होणार हलका
Shiv Sena UBT : उबाठा शिवसेनेच्या 'या' नेत्यांवरील विभागप्रमुखांचा भार होणार हलका

शिवसेना (Uddhav Balasaheb Thackeray) गटाच्या उपनेत्यांना आता नेतेपदी बढती दिल्यामुळे आमदार सुनील प्रभू आणि आमदार अनिल परब यांना आता विभागप्रमुख पदाची खुर्ची सोडावी लागणार आहे. अनिल परब हे मागील १५ वर्षांपासून ते सुनील प्रभू हे मागील सात ते आठ वर्षांपासून विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. परंतु आता या दोन्ही विभागप्रमुखांना पक्षाच्या नेतेपदी बढती दिल्यामुळे या त्यांच्याकडील विभागप्रमुखांची खांदेपालट करण्याची वेळ आली आहे. या दोन्ही विभागांच्या प्रमुखपदांसाठी शिवसेना उबाठा गटाला अनिल परब आणि सुनील प्रभू यांच्यासारखे खमके नेतृत्व असणारे वारसदार शोधण्याची वेळ आली आहे. (Shiv Sena UBT)

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार, खासदार तसेच माजी नगरसेवकांसह पक्षाचे पदाधिकारी सोडून गेल्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिवसेना (Uddhav Balasaheb Thackeray) असे दोन गट पडले आहे. धनुष्यबाणाचे चिन्ह हे शिंदे हे मुख्यनेते असलेल्या शिवसेनेला दिल्यामुळे खरी शिवसेना आपलीच असा दावा शिंदे गटाच्या शिवसेनेने केला आहे. मात्र, एका बाजुला फुटून गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे पक्षाला गळती लागल्यानंतर शिवसेना उबाठा गटाने आपल्या पक्षाची बांधणी नव्याने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मागील वेळेस उपनेत्यांना बढती देत त्यांना नेतेपदी वर्णी लावल्यानंतर आता नव्याने बनवलेल्या उपनेत्यांपैंकी काहींची वर्णी नेतेपदी लावली आहे. यामध्ये आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र वायकर आणि आमदार सुनील प्रभू यांचा समावेश आहे. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : गाझातील लोक आता भुकेने आणि तहानेने मरतील; संयुक्त राष्ट्र संघाला आतंकवाद्यांच्या पोशिंद्यांची चिंता)

यापैंकी आमदार अनिल परब हे वांद्रे ते अंधेरी पर्यंतचे विभागप्रमुख आहेत तर आमदार सुनील प्रभू हे दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी या विधानसभेचे आमदार आहेत. अनिल परब हे मागील सुमारे १२ ते १५ वर्षांपासून विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून आजवर ते प्रवक्ते होते म्हणून या पदावर कार्यरत होते, परंतु आता ते शिवसेना उबाठा गटाचे नेते झाल्याने त्यांना आता विभागप्रमुख पदावरून दूर जावे लागणार आहे. त्यामुळे या विभागातील माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, माजी सुधार समिती अध्यक्ष सदा परब, माजी विरोधी पक्षनेते बाळा आंबेरकर, हारुन खान यांची नावे या विभागप्रमुखांच्या स्पर्धेत चर्चेत आहेत. (Shiv Sena UBT)

तर आमदार सुनील प्रभू हेही सन २०१५-१६ पासून विभागप्रमुख असून त्यांनाही आता हे पद सोडावे लागणार आहे. त्यामुळे या विभागाच्या प्रमुखपदासाठी प्रशांत कदम, समीर देसाई, राजू पाध्ये, दिलीप शिंदे, विश्वनाथ सावंत आदींची नार्वे चर्चेत आहेत. समीर देसाई हे काँग्रेस व भाजप पक्षातून शिवसेनेत आले असून ते शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या विश्वासातील आहे. तर प्रशांत कदम हे सुनील प्रभू, सुरज चव्हाण तसेच वायकर यांच्या विश्वासातील आहेत. तर विश्वनाथ सावंत हे सक्षम नेतृत्व असले तरी वायकर त्यांना या पदावर नेमण्यास उत्सुक नसतील असे बोलले जात आहे. त्यामुळे या विभागाच्या विभागप्रमुख पदावर आता कुणाची वर्णी लागते की नेत्यांवरच विभागप्रमुखांची जबाबदारी पक्ष कायम ठेवत याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.