Israel-Palestine Conflict : गाझातील लोक आता भुकेने आणि तहानेने मरतील; संयुक्त राष्ट्र संघाला आतंकवाद्यांच्या पोशिंद्यांची चिंता

युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्रामने म्हटले आहे की, गाझा पट्टीतील परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. येथे केवळ चार ते पाच दिवसांचे रेशन दुकानात शिल्लक आहे. गाझा पट्टीत चार ते पाच पिठाच्या गिरण्या असून इंधनाअभावी त्यापैकी फक्त एकच गिरणी सुरू आहे.

97
Israel-Palestine Conflict : गाझातील लोक आता भुकेने आणि तहानेने मरतील; संयुक्त राष्ट्र संघाला आतंकवाद्यांच्या पोशिंद्यांची चिंता
Israel-Palestine Conflict : गाझातील लोक आता भुकेने आणि तहानेने मरतील; संयुक्त राष्ट्र संघाला आतंकवाद्यांच्या पोशिंद्यांची चिंता

इस्रायल आणि हमास यांच्यातील दिवसेंदिवस अधिक भीषण होत आहे. (Israel-Palestine Conflict) इस्रायलच्या इशाऱ्यानंतर उत्तर गाझामध्ये राहणारे लोक जीव वाचवण्यासाठी धावत आहेत. उत्तर गाझामधून 1.1 दशलक्ष लोक विस्थापित झाले आहेत, त्यापैकी मोठ्या संख्येने दक्षिण गाझामधील खान युनिस येथे पोहोचले आहेत. परंतु दक्षिण गाझामधील परिस्थिती दयनीय झाली आहे. युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्रॅम (UNWFP) ने म्हटले आहे की, गाझा पट्टीतील परिस्थिती गंभीर होत आहे. येथे केवळ चार ते पाच दिवसांचे रेशन दुकानात शिल्लक आहे. गाळाच्या दुकानात रेशन संपत आहे. गाझा पट्टीत चार ते पाच पिठाच्या गिरण्या असून इंधनाअभावी त्यापैकी फक्त एकच गिरणी सुरू आहे. (Israel-Palestine Conflict)

(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : २ हजार अमेरिकन सैनिक इस्त्रायलमध्ये अलर्ट मोडवर, अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचा आदेश)

इस्रायली लष्कर हमासवर जमीन, समुद्र आणि हवेतून सातत्याने बॉम्बफेक करत आहे. उत्तर गाझातून पळून जाऊन दक्षिण गाझामधील खान युनिस येथे पोहोचणाऱ्या पॅलेस्टिनींना सध्या भेडसावणारे सर्वात मोठे संकट म्हणजे पाणी. दक्षिण गाझामध्ये पाण्याची एकच पाइपलाइन असून ही पाइपलाइन दिवसातून केवळ तीन तास सुरू असते, त्यामुळे खान युनिसच्या सुमारे एक लाख लोकसंख्येपैकी निम्म्या लोकांनाच मर्यादित पाणी मिळत आहे. (Israel-Palestine Conflict)

संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे की, पॅलेस्टिनींसाठी पाणी हे सर्वात मोठे आव्हान आहे; कारण पाण्याशिवाय गंभीर परिस्थिती निर्माण होईल. अशा परिस्थितीत डिहायड्रेशन आणि इतर आजारांमुळे परिस्थिती आणखी बिकट होईल. ब्रेडचा पुरवठा नगण्य आहे. लोकांना ब्रेडसाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते. जखमींसाठी औषधे नाहीत. जागतिक अन्न कार्यक्रमाचे मध्य पूर्व प्रवक्ते अबीर इतेफा म्हणतात की, WFP च्या गाझामध्ये 23 बेकरी आहेत, त्यापैकी फक्त पाच  सुरू आहेत. मात्र गाझामधील पुरवठा संपण्याच्या मार्गावर आहे. यापैकी सहा लाख लोक खान युनिस आणि रफाह येथे पोहोचले आहेत तर सुमारे चार लाख लोक संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये आहेत. (Israel-Palestine Conflict)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.