Marathi Gujarati Dispute : एका बोर्डवरून घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वादाची ठिणगी?

80
Marathi Gujarati Dispute : एका बोर्डवरून घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वादाची ठिणगी?

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे. हा नवीन वाद मराठी आणि गुजराती (Marathi Gujarati Dispute) असा रंगला आहे. अशातच आता घाटकोपरमध्ये देखील या वादाचे पडसाद उमटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरमध्ये एका उद्यानाला लावण्यात आलेला गुजराती बोर्डवरून मराठी – गुजराती हा वाद चांगलाच पेटला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून एका उद्यानात लावण्यात आलेला ‘मारु घाटकोपर’ अशा आशयाच्या गुजराती बोर्डाची तोडफोड करण्यात आली.

घाटकोपर पूर्व येथील उद्यानाला लावण्यात आलेल्या ‘मारु घाटकोपर’ हे गुजराती (Marathi Gujarati Dispute) मधलं नाव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडून टाकलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हे गुजरातीमध्ये असलेलं नाव मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत होतं. या अगोदर मनसेनं देखील हे नाव काढण्याची मागणी केली होती. मात्र मध्यरात्री शिवसेना ठाकरे (Marathi Gujarati Dispute) गटाच्या शिवसैनिकांनी अचानक या नावाची तोडफोड केली. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद उफाळून येणार असल्याचं बोललं जात आहे.

(हेही वाचा – Indian Air Force Day : जाणून घ्या भारतीय वायूदल सेनेची स्थापना कधी झाली?)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. एवढंच नाहीतर त्यावरुन मोठा वादही (Marathi Gujarati Dispute) सोशल मीडियावर सुरू होता. तो फोटो होता घाटकोपर पूर्व येथे लावण्यात आलेला ‘मारु घाटकोपर’ बोर्ड. घाटकोपर पूर्व येथील एका उद्यानात हा बोर्ड लावण्यात आलेला. हा बोर्ड तात्काळ हटवावा अशी मागणी सातत्यानं मनसेच्या वतीनं महापालिकेकडे केली जात होती. तसेच, महापालिकेला अल्टिमेटमही मनसेच्या वतीनं देण्यात आला होता. मात्र, मध्यरात्री अचानक काही लोकांकडून या बोर्डाची तोडफोड करण्यात आली.

त्यानंतर आता ठाकरे गटाकडून या बोर्डाचा (Marathi Gujarati Dispute) आधीचा फोटो आणि तोडफोड केल्यानंतरचा फोटोही एकत्र करुन शेअर करण्यात येत आहे. तसेच, त्या फोटोवर मुंबईचा मराठीबाणा पुसण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी हाणून पाडला, असा मजकूरही लिहिण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.