Israel-Palestine Conflict : इस्रायलमधील भारतीय विद्यार्थी दूतावासाच्या संपर्कात; सांगितले भीतीदायक अनुभव 

73
Israel-Palestine Conflict : इस्रायलमधील भारतीय विद्यार्थी दूतावासाच्या संपर्कात; सांगितले भीतीदायक अनुभव 
Israel-Palestine Conflict : इस्रायलमधील भारतीय विद्यार्थी दूतावासाच्या संपर्कात; सांगितले भीतीदायक अनुभव 

इस्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेथे असलेल्या भारतियांशी संपर्क करण्याचा प्रयत्न चालू आहे. (Israel-Palestine Conflict) अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी म्हटले आहे की, इस्रायलवरील हमासच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते घाबरलेले आहेत. ते भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात आहेत. इस्रायलमधील एक भारतीय विद्यार्थी गोकू मानवलन म्हणाला, “मी खूप घाबरलो आहे. आमच्याजवळ इस्रायली पोलिस दल आहे. आतापर्यंत आम्ही सुरक्षित आहोत. आम्ही भारतीय दूतावासातील लोकांच्या संपर्कात आहोत. आजूबाजूला चांगला भारतीय समुदाय आहे आणि आम्ही एकमेकांशी जोडलेले आहोत, ही एक जमेची बाजू आहे.” (Israel-Palestine Conflict)

(हेही वाचा – Indian Air Force Day : जाणून घ्या भारतीय वायूदल सेनेची स्थापना कधी झाली? )

विमल कृष्णसामी मणिवन्नन चित्रा या आणखी एका विद्यार्थ्याने सांगितले की, हा हल्ला अतिशय तीव्र आणि भीतीदायक होता. ते म्हणाले, “भारतीय दूतावास गटात आमच्या संपर्कात आहे. ते आमच्यावर लक्ष ठेवून आहेत.”

आदित्य करुणानिथी निवेदिता या विद्यार्थ्याने सांगितले, “इस्रायलमध्ये धार्मिक सुट्ट्या सुरू आहेत. अचानक पहाटे साडेपाच वाजता सायरन वाजले. आम्ही सुमारे 7-8 तास बंकरमध्ये होतो. आम्हाला आमच्या घरात राहण्यास सांगितले आहे.आम्ही भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहोत आणि ते आम्हाला भविष्यातील गोष्टींसाठी अपडेट करतील.”

इस्रायलच्या तेल अवीव, रेहोवोट, गेडेरा आणि अश्केलॉनसह अनेक शहरांच्या रहिवासी भागांत हमासने हल्ले चालू केले आहेत. हमासचे अनेक दहशतवादी गाझा पट्टीतून इस्रायलमध्ये घुसले आणि इस्त्रायली शहरे ताब्यात घेतली. या पार्श्वभूमीवर तेथील भारतियांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात आहे.  (Israel-Palestine Conflict)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.