Rashmi Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे कुटुंब ॲक्शन मोडवर; रश्मी ठाकरे सक्रीय राजकारणात उतरणार?

184

देशात आणि राज्यात निवडणुकीचे वारे वेगाने वाहण्यास सुरुवात झाली. त्यात शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या हातून पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही निसटले आहे आणि त्यामुळे ठाकरे गट सर्वच पातळीवर विरोधकांवर प्रहार करण्याची रणनीती आखत आहे.

त्यात प्रामुख्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे राज्यभरात दौरे करत आहेत. पक्षाच्या शाखांना भेटी देत आहेत. त्यातच आता रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनीही ठाकरे गटाची महिला आघाडी मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अलीकडच्या काळात ठाकरे गटातून नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, मीना कांबळी यांच्यासारखे प्रमुख चेहरे एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यामुळे महिला आघाडीची ताकद काहीशी कमी झाली. मात्र नवीन नेतृत्वासोबत ठाकरे गटाची महिला आघाडी भरारी घेण्याच्या तयारीत आहेत.

(हेही वाचा Ayodhya Ram Mandir : १५२८ ते २०२४ अयोध्या श्रीराम मंदिराचा ५०० वर्षांचा संघर्ष)

दरम्यान, १६ जानेवारी ते २० जानेवारी हा विदर्भात दौरा सुरू करण्यात आला. गडचिरोली ते विदर्भातील सर्व जिल्ह्यात महिला पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा दौरा राज्यभरात करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या उपनेत्या विशाखा राऊत, ज्योती ठाकरे, संजना घाडी, किशोरी पेडणेकर, शीतल देवरुखकर अशा वेगवेगळ्या गटाने हा दौरा होईल अशी माहिती रंजना नेवाळकर यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात देखील नवरात्रीच्या दरम्यान रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी पोहोचून शिवसेनेच्या महिला समवेत देवीचे दर्शन घेत एक प्रकारे मोठ्या शक्ती प्रदर्शन मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात करून दाखवले होते. त्यामुळे आता येणाऱ्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने धुरा सांभाळण्यासाठी रश्मी ठाकरे देखील मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. या दौऱ्याची सुरुवात रामटेक लोकसभा मतदारसंघातून केली जाणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.